शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

ऐन हंगामात शेतकऱ्यांवर काळाचा घाला

By admin | Updated: May 15, 2016 00:18 IST

२० लाखांची हानी : मळगावात काजू, आंबा बागेला आग

तळवडे : मळगाव-कोमोळ तळी याठिकाणी रेल्वे ट्रॅकलगत असलेल्या २५ एकर जागेत असणाऱ्या आंबा, काजू बागेस आग लागून २० ते २२ लाख रूपयांची हानी झाली आहे. काबाडकष्टातून फुलविलेली आंबा-काजू, माडाची झाडे ऐन हंगामात क्षणार्धात आगीत होरपळून खाक झाली. ही आग दुपारी एकच्या सुमारास ऐन उन्हाच्या कडाक्यात लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, ही आग कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही. मळगाव येथील रेल्वे स्थानकाच्या शेजारील असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या आंबा, काजूच्या बागा आहेत. शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास या बागांना अचानक आग लागली. ऐन दुपारच्या कडक उन्हातच ही आग लागल्याने क्षणार्धात आगीचा भडका उडाला. बघता बघता ही आग दुरवर विस्तारली. काही कळायच्या आतच आगीचे लोट आकाशात जाऊन शेजारच्या बागांमध्ये आग शिरली. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण विस्तारलेल्या आगीने ते कठीण बनले होते. शेवटी सावळवाडा येथील ग्रामस्थांनी ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील बागांवरील अनर्थ टळला. दरम्यान, या आगीमध्ये मळगावातील शेतकरी श्रीधर गावकर, सोमा गावकर, बबन गावकर, विजय सावळ, द्वारकानाथ सावळ, नंदकिशोर सावळ, रमेश सावळ, प्रशांत राऊळ या शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी मळगाव सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य गजानन सातार्डेकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सोनुर्लेकर, विजय हरमलकर, महेश शिरोडकर, पोलीस पाटील रोशनी जाधव, ग्रामपंचायत सदस्य आनंद देवळी आदी घटनास्थळी उपस्थित होते. दरम्यान, या आगीने शेतकऱ्यांचे जवळपास वीस ते पंचवीस लाखाचे नुकसान झाले असून शासनामार्फत भरपाई देण्याची मागणी पंचक्र ोशीतून होत आहे. (प्रतिनिधी)अश्रू आणि घामाच्या धारा...अनेक वर्षाच्या मेहनतीने उभारलेल्या बागा ऐन हंगामात डोळ्यासमोर क्षणार्धात पेटता पाहणाऱ्या शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. ही आग विझविण्याचा प्रयत्न करताना शेतकऱ्यांच्या हातात पाणी होते तर डोळ्यांतून अश्रूंच्या व अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. डोळ्यासमोरच उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत होरपळल्याने शेतकरीही हवालदिल झाले होते. हे दृश्य पाहणारेही भावूक झाले होते.