शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे निगुडे गाव अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 17:29 IST

अचानक झालेल्या वादळी अवकाळी पावसाचा फटका निगुडे गावाला बसला. निगुडेत झालेल्या पावसामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाºयामुळे आंब्याचे झाड कोसळून विजेचे तीन खांब कोसळले

ठळक मुद्देतीन वीज खांब कोसळले : अवकाळी पावसामुळे सर्वांचीच तारांबळ

बांदा : अचानक झालेल्या वादळी अवकाळी पावसाचा फटका निगुडे गावाला बसला. निगुडेत झालेल्या पावसामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाºयामुळे आंब्याचे झाड कोसळून विजेचे तीन खांब कोसळले. त्यामुळे निगुडे गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला. यामुळे निगुडे गावाला शनिवारी मध्यरात्री १२.३० नंतर अंधारात रहावे लागले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वीज वितरणचे नुकसान झाले. अवकाळी पावसाने काजू, आंबा, जांभूळ, करवंद, कोकम आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अवकाळी पावसाने काजू पिकावर परिणाम झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. महावितरणच्या तंत्रज्ञ व इतर कर्मचाऱ्यांनी, ग्रामस्थांनी युद्धपातळीवर काम करीत रविवारी सांयकाळी ६.३० वाजता वीजपुरवठा सुरळीत केला. शनिवारी दुपारपासूनच वातावरणातील उष्म्यात प्रचंड वाढ झाली होती. तसेच सायंकाळी ढगाळ वातावरण होते. मध्यरात्री १२.३० च्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी नुकसान झाले.

निगुडे येथे सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे आंब्याचे झाड कोसळून तीन विजेचे खांब कोसळले व गावातील वीजपुरवठा खंडित झाला. याबाबतची माहिती मिळताच निगुडे ग्रामपंचायत सदस्य प्रताप गावडे, उमेश गावडे, संदीप राणे, नारायण राणे आदींनी सहकार्य केले. निगुडेचे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून वीज अधिकाºयांना कल्पना दिली. एका छतावर वीज खांब पडल्याने सिमेंटच्या पत्र्यांचे नुकसान झाले. सर्व विद्युत तारा रस्त्यावर पडल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आला होता.

विद्युत वितरणला माहितीदिल्यानंतर विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यासाठी रविवारी कर्मचारी दाखल झाले.रविवारी सकाळी घटनास्थळी निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी येत सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. त्वरित याठिकाणी विद्युत खांब उभारण्यात यावेत अशी तातडीची मागणी करण्यात आली.

सध्या एप्रिल महिना म्हणजे उष्म्याचा काळ सुरू आहे. रस्त्यावर पडलेले आंब्याचे झाड बाजूला करण्यात आले. यावेळी निगुडे ग्रामपंचायत सदस्य प्रताप गावडे, उमेश गावडे, संदीप राणे, पंढरीनाथ राणे, नारायण राणे, दीपक पवार, महेश गावडे यांनी मदतकार्यात सहभाग घेतला. यावेळी महावितरणचे वायरमन मयेकर, कुडव तसेच लाईनमन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीचे दीपक निगुडकर आदी उपस्थित होते.

नागरिकांमधून नाराजीयेथील महावितरणचे अभियंता अनिल यादव हे सुटीवर असल्यामुळे तसेच त्यांनी या घटनेकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. याठिकाणी जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण? त्यामुळे शाखा अभियंता यांची कसून चौकशी करावी, अशी मागणी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केली.

वादळी पावसामुळे आंब्याच्या झाडासह विजेचे तीन खांब कोसळून पडल्याने निगुडेतील वीजपुरवठा खंडित झाला होता.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग