शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

Coronavirus Unlock : कणकवलीत लॉकडाऊनमुळे शुकशुकाट, बाजारपेठेत कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 16:25 IST

कोरोना विषाणूचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे कणकवली शहरात शुकशुकाट पसरला होता.

ठळक मुद्देव्यापारी महासंघाच्या आवाहनालाही प्रतिसादमहामार्गावर अत्यावश्यक सेवेतील वाहने, पोलिसांकडूनही तपासणी

कणकवली : कोरोना विषाणूचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे कणकवली शहरात शुकशुकाट पसरला होता.

फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहने महामार्गावर अधूनमधून फिरताना दिसत होती. तसेच पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, व्यापारी महासंघाने केलेल्या बंदच्या आवाहनालादेखील अनेक व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला.दररोज साधारणत: पहाटे ५ वाजल्यापासून कणकवली शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठा गजबजू लागतात. व्यापारी आपली दुकाने उघडून व्यवसाय सुरू करतात. त्यामुळे सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बाजारपेठ गजबजलेली दिसून येते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलीकडे बाजारपेठ उशिराने उघडते.पण, लॉकडाऊनमुळे गुरुवारी कणकवली शहरात सकाळपासूनच शुकशुकाट होता. ग्रामीण भागातही काहीशी तशीच स्थिती होती. सकाळी काही वेळ तुरळक प्रमाणात किराणा मालाची दुकाने उघडली होती. मात्र, ती दहा वाजण्याच्या सुमारास बंद करण्यात आली. त्यामुळे त्यानंतर शहरात शुकशुकाट पसरला होता. अनेक नागरिकांनीही घरीच राहणे पसंत केले.कणकवलीतील अप्पासाहेब पटवर्धन चौक, मुख्य बाजारपेठ, आचरा रोड याठिकाणी दररोज अनुभवायला मिळणारी वाहतू कोंडी गुरुवारी आढळून आली नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी ८ जुलैपर्यंत जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळामार्फत अनेक मार्गांवरील बससेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, सिंधुदुर्गनगरी येथे जाणाºया गाड्यांच्या फेºया सुरू ठेवण्यात आल्या होत्या.कणकवली तालुक्यातील फोंडाघाट, नांदगाव, तळेरे, खारेपाटण, कनेडी या प्रमुख मोठ्या बाजारपेठा आहेत. या बाजारपेठांमध्ये दरदिवशी मोठी रहदारी असते. लॉकडाऊनच्या निमित्ताने या बाजारपेठा सकाळपासूनच ओस पडल्या होत्या. त्यातच पावसाच्या सरी कोसळत असल्याने गारवाही पसरला होता.चोख बंदोबस्तकायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस तसेच पोलिसांची पथके ठिकठिकाणी तैनात होती. गस्तही सुरू होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच विनाकारण फिरणाऱ्या लोकांची झाडाझडती घेतली जात होती. शहराच्या सर्वच भागात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारsindhudurgसिंधुदुर्ग