शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 14:07 IST

टेम्पोने आंबोली घाटात दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहा वर्षाची चिमुकली निकिता प्रसाद राऊत ही जागीच ठार झाली.

सावंतवाडी : फरशाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने आंबोली घाटात दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहा वर्षाची चिमुकली निकिता प्रसाद राऊत( १० रा.फौजदारवाडी आंबोली) ही जागीच ठार झाली. तर तिची आई चैताली ही गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी ११ वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटात पायथ्याला असलेल्या नानापाणी जवळ घडली. 

अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न असलेल्या टेम्पो आंबोली घाटात युटर्न जवळ पलटी झाल्यामुळे तब्बल अडीच तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघातानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत टेम्पो चालकाला आमच्या ताब्यात द्या, अशी आक्रमक मागणी केली त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले घटनेनंतर पोलिसांकडून काही वेळाने वाहतूक सुरळीत झाली.

आंबोलीहून सावंतवाडीच्या दिशेने येत असलेल्या दुचाकी चालक राऊत हे आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेल्या नानापाणी जवळ आले असता  आंबोली गोव्याच्या दिशेने जात असलेल्या टेम्पो चालक हा मद्याच्या नशेत होता.त्याच अवस्थेत भरधाव वेगात चालला असतनाच त्याने नानापाणी जवळ राऊत याच्या दुचाकीला  जोरदार धडक दिली या धडकेत चिमुकली गाडीवरून खाली पडल्या मुळे ती जागीच ठार झाली. तर त्यांच्या  पत्नी या गंभीर जखमी झाल्या आहेत.

हा प्रकार टेम्पो चालकांच्या लक्षात आल्यानंतर चालकाने सावंतवाडी च्या दिशेने पळ काढला काही किलोमीटर गेल्या नंतर  चालकाचा गाडीवर ताबा सुटल्यामुळे ट्रक यु आकाराच्या वळणा वर  रस्त्याच्या मधोमध पलटी झाली तर फरशाही रस्त्यावर कोसळल्या त्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल अडीच तास ठप्प झाली होती.

अपघातानंतर लागलीच निकिताचा मृतदेह आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र आणण्यात आला घटनेची माहिती मिळाल्यानंतर आंबोलीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली तसेच चालक व क्लीनरच्या विरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली आमच्या चिमुकलीच्या मृत्यूला जबाबदार ठरणाऱ्या या दोघांना ताब्यात द्या अशी मागणी करत आक्रमक भूमिका घेतली यावेळी पोलीस हवालदार रामदास जाधव व संतोष गलोले यांनी योग्यरीत्या परिस्थिती हाताळली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळावर धाव घेतली ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली अपघातानंतर वाहतूक ठप्प झाली होती त्याच वेळी तेथे जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा आणि नगरसेवक देवा टेमकर यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला तसेच जखमींना ग्रामस्थांनी मोठी मदत केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Drunk Tempo Driver Hits Bike in Sawantwadi: Girl Dies

Web Summary : In Sawantwadi, a drunk tempo driver hit a bike, killing a ten-year-old girl and seriously injuring her mother. The tempo overturned, blocking traffic. Villagers demanded the driver's arrest. Police are investigating.
टॅग्स :SawantwadiसावंतवाडीAccidentअपघातDeathमृत्यू