शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, काळगाव-तळमावले रस्त्यावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 11:51 IST

काळगाव-तळमावले रस्त्यावर पहाटेच्या सुमारास धामणी गावापासून जवळच एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने सव्वा वर्षाच्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. वनविभागाने ही माहिती मिळताच जाग्यावर धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरु केली होती. सकाळपासून मृत बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. 

ठळक मुद्देवाहनाच्या धडकेत बिबट्या ठारअज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद

सणबूर : काळगाव-तळमावले रस्त्यावर पहाटेच्या सुमारास धामणी गावापासून जवळच एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने सव्वा वर्षाच्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. वनविभागाने ही माहिती मिळताच जाग्यावर धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरु केली होती. सकाळपासून मृत बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. धामणी-काळगाव परिसरात बिबट्या दिसल्याची लोकांच्यात चर्चा होती, आजच्या या घटनेने सर्वांना याची खात्री झाली आहे. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धामणी गावापासून काही अंतरावर भावके वस्तीच्या पुढे हा बिबट्या ओढ्याकडील पाणवठ्याकडुन डोंगराच्या दिशेला निघाला होता.

यावेळी काळगाव कडून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात सव्वा वर्षाचा बछड्या जागीच ठार झाला. यावेळी त्याच्याबरोबर त्याची आई किंवा वडील असावेत असा अंदाज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.घटनास्थळी वनक्षेत्रपाल काळे, कर्मचारी अमृत पन्हाळे उपस्थित होते. घटनास्थळी याचा पंचनामा सुरू होता. काळे यांनी यावेळी सांगितले की या मृत बछड्यास आम्ही शवविच्छेदनासाठी नेत असून यानंतर इन कॅमेरा त्याचे दहन केले जाणार आहे. अज्ञातविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे

टॅग्स :leopardबिबट्याSatara areaसातारा परिसर