शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

समस्यांवर तोडगा काढा, अन्यथा माझ्याशी गाठ : नीतेश राणे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 11:26 IST

कणकवलीत चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. दिवसेंदिवस वाहतूक कोंडी होत आहे. धुळीच्या प्रादुर्भावाने सर्वसामान्य लोक आजारी पडू लागले आहेत. गांगो मंदिरासमोर अंडरपास न झाल्यास फार वेगळे परिणाम होतील. गोड बोलून लोकांच्या जमिनी घेईपर्यंत शांत बसलात का? शहराची जबाबदारी कोण घेणार? सर्व समस्या लवकरात लवकर न सुटल्यास माझ्याशी गाठ आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना आमदार नीतेश राणे यांनी खडसावले.

ठळक मुद्देसमस्यांवर तोडगा काढा, अन्यथा माझ्याशी गाठ  : नीतेश राणे यांचा इशारा लोकांच्या मागणीप्रमाणेच कणकवलीत काम झाले पाहिजे

कणकवली : कणकवलीत चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. दिवसेंदिवस वाहतूक कोंडी होत आहे. धुळीच्या प्रादुर्भावाने सर्वसामान्य लोक आजारी पडू लागले आहेत. गांगो मंदिरासमोर अंडरपास न झाल्यास फार वेगळे परिणाम होतील. गोड बोलून लोकांच्या जमिनी घेईपर्यंत शांत बसलात का? शहराची जबाबदारी कोण घेणार? सर्व समस्या लवकरात लवकर न सुटल्यास माझ्याशी गाठ आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना आमदार नीतेश राणे यांनी खडसावले.कणकवली नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षांच्या दालनात गुरुवारी झालेल्या बैठकीत आमदार नीतेश राणे यांनी प्रकाश शेडेकर, दिलीप बिल्डकॉनचे प्रोजेक्ट मॅनेजर रवी कुमार यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, स्वाभिमानचे शहराध्यक्ष राकेश राणे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, सचिन म्हाडगुत, अनिल शेटये, शिशिर परूळेकर, सोमनाथ गायकवाड, रामदास मांजरेकर, संदीप नलावडे, अभय राणे, किशोर राणे, आनंद राणे यांच्यासह प्रकल्पबाधित व शहरातील नागरिक उपस्थित होते.यावेळी नीतेश राणे म्हणाले, पावसाळ्यात तुम्हांला कणकवलीला बुडवायचे आहे का? आम्ही जमिनी दिल्या, त्यामुळे लोकांच्या मागणीप्रमाणेच काम झाले पाहिजे़. कणकवलीत चौपदरीकरणाचे काम तुम्ही करता ना? मग वाहतूक कोंडी, तुंबलेली गटारे, धुळीच्या प्रादुर्भावावर कोण काम करणार? केलेल्या कामावर कोण पाणी मारणार? सर्व्हिस रोड केव्हा पूर्ण करणार? तुटलेली पाईपलाईन केव्हा सुरळीत करणार? पथदीप बंद केले ते कधी चालू करणार? या सगळ्या प्रश्नांवर तुम्हीच काम केले पाहिजे़ नुसती बोलबच्चनगिरी आता बंद करा. गोड बोलून आम्ही फसणार नाही, अशा शब्दांत प्रकाश शेडेकर यांच्यावर नीतेश राणे यांनी आगपाखड केली. जनतेच्या अडचणी न सोडविल्यास कणकवलीचा आमदार म्हणून मी गप्प बसणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.ते पुढे म्हणाले, कणकवलीत नागरिकांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. कणकवली शहरातील चौपदरीकरणाचे काम जानेवारी २०२० पर्यंत पूर्ण झाले पाहिजे. चुकीच्या पद्धतीने इमारती तोडू नयेत. अधिकारी काय कणकवलीचे जावई नाहीत. माझ्याकडे यापुढे कोणत्याही तक्रारी येता नयेत. एक जरी तक्रार आली तरी गप्प बसणार नाही, अशा सूचनाही राणे यांनी महामार्ग ठेकेदार कंपनीचे ठेकेदार रवी कुमार आणि प्रकाश शेडेकर यांना दिल्या.यावेळी संतप्त झालेल्या आमदार राणे यांनी काही वेळातच या अधिकाऱ्यांविरोधात कठोर भूमिका मांडत पुढील कार्यक्रमासाठी जाणे पसंत केले. त्यानंतर प्रकाश शेडेकर यांनी कणकवलीतील धुळीचा प्रादुर्भाव, सर्व्हिस रस्ते, स्ट्रीटलाईट तसेच धुळीवर पाणी मारण्याचे काम केले जाईल. तसेच गांगोमंदिर येथील अंडरपास जागेच्या ठिकाणी काम करणार नसल्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक बंडू हर्णे यांच्यासह शहरातील नागरिकांनीही विविध प्रश्नांवर शेडेकर यांना चांगलेच धारेवर धरले....तर महामार्गाचे काम बंद पाडणार!शहरातील गांगो मंदिर येथे अंडरपास व्हायलाच हवा. हे काम न झाल्यास डीपी रस्त्यापुढील उड्डाणपुलाचा एकही पिलर उभा करू दिला जाणार नाही. पावसाळ्यापूर्वी महामार्ग दुतर्फा सर्व गटार बांधकामे आणि सांडपाणी निचरा व्यवस्था व्हायला हवी. याबाबत दिरंगाई झाली तर महामार्गाचे काम रोखू.

शहरात दिवसातून तीन वेळा रस्त्यावर पाणी मारणे अत्यावश्यक आहे. याखेरीज वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्व्हिस रोडची रुंदी वाढविण्यात यावी. नगरपंचायतीची पाणीलाईन आणि गटारलाईन उभारून देण्यात यावी. तसेच मागील आठवड्यात ज्या ज्या ठिकाणी संयुक्त पाहणी झाली तेथील कामे पुढील चार दिवसांत व्हायला हवी़त. पावसाळ्यात शहरात पाणी साठण्याची समस्या कुठेही होता नये. जर समस्या उद्भवली तर गप्प बसणार नाही, असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग