शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
4
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
5
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
6
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
7
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणलं; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचा लाड?
8
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
9
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
10
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ!
11
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
12
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
13
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
14
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
15
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
16
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
17
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
18
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
19
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
20
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

विनाकारण आरोप करून जिल्हा बँकेची बदनामी करू नका : सतीश सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 17:13 IST

SatishSawant, Nitesh Rane, Banking Sector, sindhudurg सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राजकारण्यांनी विनाकारण आरोप करून बदनामी करू नये. या बँकेत शेतकऱ्यांसह साडेचार लाख ठेवीदारांच्या ठेवी आहेत. त्यांचा विश्वासाला तडा जाईल असे राजकारण्यांनी करू नये, असा सल्ला जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी विरोधकांना पत्रकार परिषदेत दिला आहे.

ठळक मुद्दे विनाकारण आरोप करून जिल्हा बँकेची बदनामी करू नका : सतीश सावंत बँकेतील साडेचार लाख ठेवीदारांच्या विश्वासाला तडा जाईल

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत अपुरा कर्मचारीवर्ग असल्याने ग्राहकांना तत्पर सेवा देता यावी यासाठी काही कर्मचारी केवळ दैनंदिन मानधनावर घेण्यात आले आहेत. त्यामुळे ही नोकर भरती नाही. असे सांगतानाच सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची व शेतकऱ्यांच्या घामातून निर्माण झालेली सहकारी बँक आहे.

आजपर्यंत या बँकेने शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. त्यामुळे या बँकेवर राजकारण्यांनी विनाकारण आरोप करून बँकेची बदनामी करू नये. या बँकेत शेतकऱ्यांसह साडेचार लाख ठेवीदारांच्या ठेवी आहेत. त्यांचा विश्वासाला तडा जाईल असे राजकारण्यांनी करू नये, असा सल्ला जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी विरोधकांना पत्रकार परिषदेत दिला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्हिक्टर डान्टस, विकास सावंत, विकास गावडे, आत्माराम ओटवणेकर, प्रज्ञा सावंत, प्रमोद धुरी आदी बँकेचे संचालक उपस्थित होते.

यावेळी सतीश सावंत म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या २०१८-१९चे नाबार्डकडून करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये बँकेला अ वर्ग मिळाला आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने अ वर्ग बँकेला मिळत आहे. कोरोना कालावधीतही या बँकेचा एनपीए शून्य टक्के राहिला आहे.१२२७ सभासद संस्था व साडेचार लाख ठेवीदार या बँकेचे आहेत. कोरोना कालावधीत शेतकऱ्यांना या बँकेने चांगली सुविधा पुरविली आहे. बँकेच्या व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नाही. उलट ठेवीदारांच्या ठेवी वाढल्या आहेत. संचालक मंडळाने चांगले काम केले आहे. पारदर्शक कारभार करण्याचे काम संचालक मंडळाने केले आहे. असे असतानाही काही राजकारणी बँकेत पैसे घेऊन नोकर भरती केली असल्याचे बँकेवर उलट सुलट आरोप करून बँकेला बदनाम करण्याचे कारस्थान करीत आहेत.

मुळात जिल्हा बँकेकडे कर्मचारी वर्ग अपुरा आहे. मात्र, नोकर भरती ही सध्या बंद आहे. त्यामुळे नोकर भरती करण्यात आलेली नाही. जिल्हा बँक ही राजकीय संस्था नाही. तर गोरगरीब जनतेची बँक आहे. राजन तेली हे नेहमीच राजकीय अड्ड्यावर बसणारे आहेत. राजन तेली हे जिल्हा बँकेचे राजकीय दुकान करू इच्छित आहेत. मात्र, हे आम्ही होऊ देणार नाही. महाविकास आघाडी एकत्रितपणे जिल्हा बँक निवडणूक लढणार असल्याचेही सावंत म्हणाले.बँकेने सूडबुद्धीने कोणावरही कारवाई केली नाहीकर्जाची वसुली करणे हा बँकेचा अधिकार आहे आणि ती प्रक्रिया प्रशासन पार पाडत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने ३०० जणांवर १०१ (जप्तीची) ची कारवाई करण्याचे प्रस्तावित केली आहे. यामध्ये बिनशेती, घरदुरूस्ती व गाड्यांचा समावेश आहे. यात १२ गाड्यांचा समावेश आहे. ही बँकेने केलेली कारवाई कोणावर सूडबुद्धीने केली नसल्याचेही बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Satish Sawantसतीश सावंतNitesh Raneनीतेश राणे Banking Sectorबँकिंग क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग