शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:ची मालमत्ता विकून राजकारण करतो ही निव्वळ स्टंटबाजी, प्रविण भोसलेंची मंत्री केसरकरांवर टीका

By अनंत खं.जाधव | Updated: October 2, 2024 15:31 IST

निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता लपवल्या 

सावंतवाडी : मालमत्ता विकून राजकारण केले असे म्हणणाऱ्या शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वतःच्या मालमत्ता लपवून ठेवल्या त्यावर आजही सर्वोच्च न्यायालयात खटले सुरू आहेत. त्यामुळे आता निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सहानुभूती मिळवण्यासाठी पुन्हा केसरकर मालमत्ता विकून राजकारण करतो असे नाटक करतील त्याला जनतेने फसू नये असे आवाहन माजी मंत्री प्रविण भोसले यांनी केले. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी संपली त्याचप्रमाणे मंत्री केसरकर यांचीही गॅरंटी संपलेली आहे असा टोला लगावला. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अनंत पिळणकर आधी पदाधिकारी उपस्थित होते. अर्चना घारे महाविकास आघाडीच्या उमेदवार भोसले म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेला आता बदल हवा आहे. जनतेमध्ये केसरकरांच्या बद्दल प्रचंड रोष आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून अर्चना घारे याच आमच्या उमेदवार असणार आहेत. त्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी सगळ्यांचीच गरज लागणार असल्याचे भोसले म्हणाले.केसरकरांनी लोकांची दिशाभूल केली केसरकर यांच्याशी माझे वैयक्तिक वाद नाहीत. मात्र आजपर्यंत केसरकर यांनी मंत्रिपदे भोगूनही म्हणावा तसा मतदारसंघाचा काहीच विकास केलेला नाही. मल्टीस्पेशालिटीबाबत लोकांची दिशाभूल केली असून केसरकर यांची गॅरंटी कधीच संपलेली आहे. त्यांच्यावर जनतेचा आता विश्वास राहिलेला नसून मल्टीस्पेशालिटी बाबत ते कोणाचा कसा वापर करतील हे सांगता हे येत नाहीत भविष्यात लखम सावंत यांच्या बाबतीतही काय बोलतील यांचा नेम नाही असेही भोंसले म्हणाले.निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता लपवल्याकेवळ लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी मंत्री केसरकर यांनी यापूर्वी आपण मालमत्ता विकून राजकारण केले असे म्हटले होते. मात्र मंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मालमत्तेत वाढ झाली आहे. निवडणुकीचे प्रतिज्ञापत्र सादर करताना त्यांनी स्वतः विकत घेतलेल्या मालमत्ता लपवल्या होत्या या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असल्याची आठवण ही त्यांनी यावेळी करून दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर