शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

पंचनामे युद्धपातळीवर करा, के. मंजुलक्ष्मी यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 20:19 IST

collcator, farmar, sindhudurgnews अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी विभागाने दिलेल्या प्राथमिक अंदाजापेक्षा हे नुकसान जास्त आहे. शेतीचे नुकसान नेमके किती झाले आहे हे समजण्यासाठी नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देपंचनामे युद्धपातळीवर करा, के. मंजुलक्ष्मी यांचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कृषी अधिकाऱ्यांची आढावा बैठक

सिंधुदुर्ग : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी विभागाने दिलेल्या प्राथमिक अंदाजापेक्षा हे नुकसान जास्त आहे. शेतीचे नुकसान नेमके किती झाले आहे हे समजण्यासाठी नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. कृषी विभागाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतन बैठक सभागृहात झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी हे आदेश दिले.यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासह माजी आमदार व सदस्य ॲड. अजित गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हेत्रे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांच्यासह विभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संबंधित सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे सुरू आहेत. ते तातडीने पूर्ण करावेत असे सांगून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या की, कृषी क्षेत्राचे झालेले नेमके नुकसान लवकरात लवकर समजण्यासाठी हे पंचनामे तातडीने पूर्ण होणे महत्त्वाचे आहे.आदर्श ग्राम योजनेसाठी केरचा प्रस्ताव सादर कराआदर्श ग्राम योजनेसाठी दोडामार्ग तालुक्यातील केर या गावाचा दोन कोटी १० लाख रुपयांचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमाविषयीची प्रकरणे विमा कंपनीकडे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत.त्याचा पाठपुरावा कंपनीकडे करावा अशा सूचनाही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या. यावेळी एकात्मिक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कार्यक्रम, आत्मा तसेच कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच आवश्यक सूचना केल्या.पंचनाम्यात कुचराई केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेततालुका कृषी अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून हे पंचनामे पूर्ण करावेत. पंचनामे पूर्ण करण्यात काही अडचणी असल्यास त्या कृषी अधीक्षक, प्रांताधिकारी किंवा तहसीलदार यांना कळवाव्यात. या कामी कोणत्याही अधिकाऱ्याने कुचराई केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी ॲड. अजित गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग