शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंंची जादू कायम, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 5:03 PM

सिंधुदुर्गनगरी, दि. १७ : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग  जिल्ह्यात नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या समर्थ विकास पॅनलने मुसंडी मारली आहे. शिवसेनेनेही काही जागा घेत जिल्ह्यात आपली ताकद अजूनही असल्याचे दाखवून दिले आहे. काँग्रेसला मात्र या जिल्ह्यात जागा मिळविण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील आठही तालुक्यात मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात ९५ ग्रामपंचायतीचे ...

ठळक मुद्दे काँग्रेसला अपयश, भाजपचे 'कमळ' फुललेशिवसेनेची मुसंडी सेना द्वीतीय भाजपा तृतीय स्थानी

सिंधुदुर्गनगरी, दि. १७ : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग  जिल्ह्यात नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या समर्थ विकास पॅनलने मुसंडी मारली आहे. शिवसेनेनेही काही जागा घेत जिल्ह्यात आपली ताकद अजूनही असल्याचे दाखवून दिले आहे. काँग्रेसला मात्र या जिल्ह्यात जागा मिळविण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील आठही तालुक्यात मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात ९५ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले. यात ४७ जागा समर्थ विकास पॅनेलकडे, २७ जागा शिवसेनेकडे, १२ जागा भाजपकडे, १ जागा युतीकडे तर ८ जागा गावपॅनलने पटकाविल्या आहेत.सावंतवाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींवर विजय मिळविल्याचा भाजपाने 'दावा' केला असून माडखोल, कारिवडे, भोमवाडी, सरमळे, सातोळी-बावळाट,नेमळे, विलवडे, निगुडे, बांदा, गुळदुवे, कोनशी, दाभिळ, ओवळीये, असनिये, पडवे-माजगाव, पारपोली, शिरशिंगे आणि आजगाव ग्रामपंचायतींवर 'कमळ' फुलले आहे, अशी माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी दिली आहे.सावंतवाडी तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींपैकी २४ ग्रामपंचायतींवर समर्थ विकास पॅनेलने विजय मिळविला आहे. भाजप पूरस्कृत पॅनेलने १३ ग्रामपंचायतींवर कमळ फुलविले असून शिवसेनेने ६ ग्रामपंचायतींवर भगवा फडकविला आहे. पक्ष विरहित गाव पॅनेलने ८ ग्रामपंचायतींवर विजय मिळविला असून राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त एका कास ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे.सावंतवाडी, मालवण, कणकवली आणि वैभववाडीत समर्थ विकास तर दोडामार्गमध्ये शिवसेनेने सर्वाधिक जागा मिळविल्या. देवगड, वेंगुर्ले येथील निकाल उशिरापर्यंत मिळाले नव्हते.वेंगुर्ले तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये वेतोरे येथे राधिका गावडे, वजराठ येथे महेश राणे, उभादांडा येथे देवेंद्र डिचोलकर, तुळस येथे शंकर घारे, शिरोडा येथे मनोज उगवेकर, रेडी येथे रामसिंग राणे, परबवाडा येथे विष्णु परब, परूळेबाजार येथे श्वेता चव्हाण, पालकरवाडी येथे संदीप चिचकर, म्हापण येथे अभय ठाकुर, मेढा येथे भारती धुरी, मठ येथे तुळशिदास ठाकुर, कोचरा येथे साची फणसेकर, होडावडा येथे अदिती नाईक, दाभोली येथे उदय गोवेकर, चिपी येथे गणेश तारी, भोगवे येथे रूपेश मुंडये, आसोली येथे रिया कुडव, अणसुर येथे अन्विता गावडे, आडेली येथे समिधा कुडाळकर, कुशेवाडा येथे स्नेहा राऊळ हे उमेदवार सरपंचपदासाठी विजयी झाले.माजगावमध्ये शिवसेनेचा ऐतिहासिक विजय झाला. येथे शिवसेना पुरस्कृत पॅनेलचे ११ उमेदवार विजयी झाले. समर्थ पॅनेलचे २ उमेदवार विजयी झाले. आते-भाच्याच्या लढाईत भाच्याने बाजी मारली. या निवडणूकीत जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांना धक्का बसला आहे. शिवसेनेचे सरपंचपदाचे उमेदवार दिनेश सावंत यांनी निसटता विजय मिळविला. समर्थ पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार के. टी. धुरी पिछाडीवर गेले. या निवडणुकीत पोस्टल २० मते निर्णायक ठरली. या पोस्टल मतांमध्ये दिनेश सावंत यांनी आघाडी घेतली. अटीतटीच्या या लढतीत दिनेश सावंत यांनी अखेर बाजी मारली. समर्थ विकास पॅनेलचे सरपंचपदाचे के. टी. धुरी यांचा पराभव झाला. पोस्टल मतदानात दिनेश सावंत यांचा ५ मतांनी विजय होउन अखेर माजगावात भगवा फडकला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक