शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

जिल्ह्यात अन्न-औषध प्रशासनाच्या ‘झोपा’?

By admin | Updated: June 18, 2015 00:36 IST

अनेक तक्रारी : कारवाईबाबत मात्र ढिम्मपणा

रत्नागिरी : ‘मॅगी’वर बंदी आल्यानंतर आरोग्याला हानिकारक असलेल्या चायनीज फूडवरील संभाव्य कारवाईची चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यात चायनीजच नव्हे; तर विक्री होणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्येही घातक रसायनांची भेसळ असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. मात्र, याबाबतीत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या ‘झोपा’ सुरू असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या दोन वर्षांच्या काळात जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भेसळीबाबत कोणतीही मोठी कारवाईच झाली नसल्याने शासनाचा हा विभाग जिल्ह्यात आहे की नाही, असा सवाल निर्माण झाला आहे. सध्या जिल्ह्यात चायनीज व्यवसायाला बरकत आली आहे. मात्र, या चायनीज पदार्थात अजिनोमोटोसारखा घातक पदार्थ वापरला जातो. त्यामुळे चायनीज सेंटर्समधील खाद्य खाणाऱ्या लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. मॅगीनंतर चायनीजवर गाज येणार असल्याची चर्चा असतानाच जिल्ह्यात किती चायनीज सेंटर्सना परवाने दिले आहेत, याची माहिती सांगण्यासाठी शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाकडे सक्षम अधिकारीच नाहीत. साळवी स्टॉप येथील जीवन प्राधिकरणच्या इमारतीत अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय आहे. त्याठिकाणी माहिती घेण्यास गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यानी आपणास असे किती परवाने जिल्ह्यात दिले गेले आहेत, याची माहिती नसल्याचे सांगितले. रत्नागिरीच्या या कार्यालयात परवाना अधिकारीच नसल्याने या रिक्त पदाचा भार ठाणे कार्यालयाचे परवाना अधिकारी चौधरी यांच्याकडे देण्यात आल्याचे या कार्यालयातून सांगण्यात आले. हे प्रभारी अधिकारी पंधरा दिवसानी येतात, अशी माहितीही देण्यात आली. त्यामुळेच जिल्ह्यातील खाद्यपदार्थांतील भेसळीबाबत शासनाचा हा विभाग किती गंभीर आहे, हेच स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात शहरांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने चायनीज खाद्यपदार्थ विक्रीची सेंटर्स आहेत. त्याशिवाय गावा-गावांतही चायनीज सेंटर्स सुरू झाली असून, या सेंटर्सची संख्या हजारच्यावर आहे. मात्र, त्यांची नोंदणीच अत्यल्प झाली आहे. असंख्य सेंटर्स ही कोणाच्या तरी आशीर्वादाने महिन्याची देणगी देत चालू आहेत. काही जणांना फेरीवाल्याचे परवाने देण्यात आले आहेत. सायंकाळच्यावेळी सुरू होणारी ही सेंटर्स रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत खुली असतात. तेथे चायनीज पदार्थांचा आस्वाद घेण्यास अनेकजण येतात. हे पदार्थ अत्यंत लोकप्रियही आहेत. मात्र, ते खाणे आरोग्याला किती घातक आहे, याची कोणतीही कल्पना सामान्य माणसांना नाही. असे असताना भेसळ करणाऱ्यांवर अन्न औषध प्रशासन उदार आहे काय, असा सवालही केला जात आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात अन्न-औषध प्रशासनाच्या ‘झोपा’?अनेक तक्रारी : कारवाईबाबत मात्र ढिम्मपणारत्नागिरी : ‘मॅगी’वर बंदी आल्यानंतर आरोग्याला हानिकारक असलेल्या चायनीज फूडवरील संभाव्य कारवाईची चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यात चायनीजच नव्हे; तर विक्री होणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्येही घातक रसायनांची भेसळ असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. मात्र, याबाबतीत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या ‘झोपा’ सुरू असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या दोन वर्षांच्या काळात जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भेसळीबाबत कोणतीही मोठी कारवाईच झाली नसल्याने शासनाचा हा विभाग जिल्ह्यात आहे की नाही, असा सवाल निर्माण झाला आहे. सध्या जिल्ह्यात चायनीज व्यवसायाला बरकत आली आहे. मात्र, या चायनीज पदार्थात अजिनोमोटोसारखा घातक पदार्थ वापरला जातो. त्यामुळे चायनीज सेंटर्समधील खाद्य खाणाऱ्या लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. मॅगीनंतर चायनीजवर गाज येणार असल्याची चर्चा असतानाच जिल्ह्यात किती चायनीज सेंटर्सना परवाने दिले आहेत, याची माहिती सांगण्यासाठी शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाकडे सक्षम अधिकारीच नाहीत. साळवी स्टॉप येथील जीवन प्राधिकरणच्या इमारतीत अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय आहे. त्याठिकाणी माहिती घेण्यास गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यानी आपणास असे किती परवाने जिल्ह्यात दिले गेले आहेत, याची माहिती नसल्याचे सांगितले. रत्नागिरीच्या या कार्यालयात परवाना अधिकारीच नसल्याने या रिक्त पदाचा भार ठाणे कार्यालयाचे परवाना अधिकारी चौधरी यांच्याकडे देण्यात आल्याचे या कार्यालयातून सांगण्यात आले. हे प्रभारी अधिकारी पंधरा दिवसानी येतात, अशी माहितीही देण्यात आली. त्यामुळेच जिल्ह्यातील खाद्यपदार्थांतील भेसळीबाबत शासनाचा हा विभाग किती गंभीर आहे, हेच स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात शहरांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने चायनीज खाद्यपदार्थ विक्रीची सेंटर्स आहेत. त्याशिवाय गावा-गावांतही चायनीज सेंटर्स सुरू झाली असून, या सेंटर्सची संख्या हजारच्यावर आहे. मात्र, त्यांची नोंदणीच अत्यल्प झाली आहे. असंख्य सेंटर्स ही कोणाच्या तरी आशीर्वादाने महिन्याची देणगी देत चालू आहेत. काही जणांना फेरीवाल्याचे परवाने देण्यात आले आहेत. सायंकाळच्यावेळी सुरू होणारी ही सेंटर्स रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत खुली असतात. तेथे चायनीज पदार्थांचा आस्वाद घेण्यास अनेकजण येतात. हे पदार्थ अत्यंत लोकप्रियही आहेत. मात्र, ते खाणे आरोग्याला किती घातक आहे, याची कोणतीही कल्पना सामान्य माणसांना नाही. असे असताना भेसळ करणाऱ्यांवर अन्न औषध प्रशासन उदार आहे काय, असा सवालही केला जात आहे. (प्रतिनिधी)