शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश लागू; ..'यामुळे' जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला हा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 12:09 IST

कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मनाई आदेश लागू केला आहे.

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८ जुलै पासून १२ ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीसाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी मनाई आदेश लागू केला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ जुलै ते ९ ऑगस्ट रोजी मोहरम उत्सव, २ ऑगस्ट रोजी नागपंचमी,११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन, नारळी पोर्णिमा सण पारंपारिक पद्धतीने साजरे होणार आहेत. तसेच कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २१ जुलै रोजी सुरू झाली असून १२ ऑगस्ट पर्यंत ती सुरू राहणार आहे. तसेच  माध्यमिक शालांत्न परीक्षा प्रमाणपत्र परीक्षाही १२ ऑगस्ट पर्यंत आहे.राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झालेले असून काही राजकीय पक्षातील प्रतिस्पर्धी गट आपापल्या कार्यकर्त्यांची जमवाजमव करुन एकमेकांना लक्ष करत असून त्यातून काही ठिकाणी आंदोलनात्मक घटना घडलेल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून अचानकपणे मोर्चा, वैयक्तिक मागणीकरिता उपोषणे, निदर्शने, रास्ता रोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मनाई आदेश लागू केला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcollectorजिल्हाधिकारी