कणकवली : एआयबीईए या बँक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संघटनेला २० एप्रिल रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली. संघटनेच्या ७६व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आणि सध्या देशभरात वाहणारे खासगीकरणाचे वारे लक्षात घेता संघटनेतर्फे बँक खासगीकरणाविरोधी अभियान सुरू करण्यात आले आहे. सरकारी बँकांमध्ये सामान्य जनतेच्या प्रचंड ठेवी आहेत, तर सर्वसामान्यांना कर्जपुरवठा याच बँकांमधून केला जातो. याबाबत जनजागृती करणारे एक पत्रक सावंतवाडी व कणकवली शहरात सुमारे ५००० नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.संबंधित पत्रक नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून कणकवली व सावंतवाडी शहरात अशा व्यक्तिंना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सर्वसामान्य खातेदारांबरोबरच समाजातील महनीय व्यक्तींशी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधून आणि त्यांना प्रत्यक्ष भेटून बँक खासगीकरण विरोधी मोहिमेला त्यांचा पाठिंबा मिळविला. तसेच निवेदनावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांची संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली व त्यांच्याशी बँक खासगीकरण विरोधी मोहिमेची चर्चा केली. सरकारी बँका सार्वजनिक क्षेत्रातच असल्या पाहिजेत, या भूमिकेला पाठिंबा देत त्यांनी संघटनेतर्फे लोकसभेत सादर करावयाच्या निवेदनावर स्वत:ची स्वाक्षरी केली.जनआंदोलनाला सुरुवातकणकवली शहरात महाराष्ट्र बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत या जनआंदोलनाला सुरुवात केली. यावेळी पत्रकार अशोक करंबेळकर यांना बँक खासगीकरण विरोधी अभियानाचे पत्रक देऊन त्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी उज्ज्वला धानजी, पूर्वा मराठे, रक्षिता गवाणकर व इतर उपस्थित होते. आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक सुशांत नाईक यांनी पाठिंबा देत संघटनेतर्फे लोकसभेला देण्यात येणाऱ्या निवेदनावर आपली स्वाक्षरी केल्याचेही संघटनेतर्फे म्हटले आहे.
अभियानाला सहकार्य करणाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 19:14 IST
kankavli BankingSector Sindhudurg : एआयबीईए या बँक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संघटनेला २० एप्रिल रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली. संघटनेच्या ७६व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आणि सध्या देशभरात वाहणारे खासगीकरणाचे वारे लक्षात घेता संघटनेतर्फे बँक खासगीकरणाविरोधी अभियान सुरू करण्यात आले आहे.
अभियानाला सहकार्य करणाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप
ठळक मुद्देबँक कर्मचारी संघटनेचे मास्क, सॅनिटायझरचे वाटप खासगीकरणविरोधी पत्रकांच्या माध्यमातून जनजागृती :