शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

CoronaVirus Lockdown : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:30 IST

विकास प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत जिल्ह्यातील २५० गरजू कुटुंबांना मोफत धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील ७५० कुटुंबांना हे धान्य वाटप करण्यात येणार असून याचा शुभारंभ कणकवली तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप विकास प्रबोधिनी संस्थेमार्फत जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना मदत

तळेरे : विकास प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत जिल्ह्यातील २५० गरजू कुटुंबांना मोफत धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील ७५० कुटुंबांना हे धान्य वाटप करण्यात येणार असून याचा शुभारंभ कणकवली तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते करण्यात आला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच सामान्य जनतेच्या अडचणी वाढत आहेत. सर्वात मोठी अडचण दररोज पोट भरण्याची असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास प्रबोधिनी संस्था जिल्ह्यातील दुर्बल महिला आणि मोलमजुरी करणाऱ्या लोकांसाठी पुढे सरसावली आहे.

याची सुरुवात कणकवली येथे ४० जणांना तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते वस्तू देऊन करण्यात आली. यावेळी डॉ. विद्याधर तायशेट्ये, हरिभाऊ भिसे उपस्थित होते. यावेळी विकास प्रबोधिनी संस्था अध्यक्षा जयश्री धनावडे, सचिव अनुया कुलकर्णी आणि संस्था सदस्य भिसे यांनी संस्थेचा पुढील उपक्रम ५०० जणांना किट वाटपासाठी जिल्ह्यातील मान्यवरांनी मदत करावी, असे आवाहन केले.यावेळी वाटप करण्यात आलेल्या साहित्यामध्ये किराणा कीट, तूरडाळ, कांदे, बटाटे, तेल, मसूर, हरभरे, रवा, मीठ, कपडे साबण, अंगाचा साबण, साखर, चहा पावडर, तिखट, हळद, इत्यादी वस्तू देण्यात आल्या.आर्थिक नियोजनानुसार धान्य वाटपगेल्या ८ दिवसांत कणकवली, कुडाळ, वैभववाडी व देवगड तालुक्यांतील काही गावांचा सर्व्हे करून मोलमजुरी करणाऱ्या ७५० कुटुंबांची यादी तयार केली. या सर्वांना आवश्यक किराणा मिळेल असे कीट तयार करून ते वाटप करण्याचे ठरविले. त्यानुसार आर्थिक नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात २५० कुटुंबाना संस्थेने धान्याचे वाटप केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग