शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

मालवण पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गटार खोदाईवरून नगरसेवकांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 15:10 IST

मालवण पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील गटार खोदाईवरून अनेक नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केली. या विषयावरून वाद वाढत असल्याने गटार खोदाईबाबत प्रशासनाने नगरसेवकांच्या तक्रारीनुसार तत्काळ कार्यवाही करावी अशी सूचना दिली. खोदाईवरून आक्रमक बनलेल्या नगरसेवकांशी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी चर्चा करून आपण स्वत: पाहणी करू असे स्पष्ट केले.

ठळक मुद्देमालवण पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गटार खोदाईवरून नगरसेवकांची नाराजीमुख्याधिकाऱ्यांनी स्वत: पाहणी करणार असल्याचे केले स्पष्ट

मालवण : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील गटार खोदाईवरून अनेक नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केली. या विषयावरून वाद वाढत असल्याने गटार खोदाईबाबत प्रशासनाने नगरसेवकांच्या तक्रारीनुसार तत्काळ कार्यवाही करावी अशी सूचना दिली. खोदाईवरून आक्रमक बनलेल्या नगरसेवकांशी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी चर्चा करून आपण स्वत: पाहणी करू असे स्पष्ट केले.नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला मुख्याधिकारी जयंत जावडेकर व सर्व नगरसेवक उपस्थित होते. शहरातील गटार खोदाईबाबत पंकज सादये यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गणेश कुशे, सुदेश आचरेकर, ममता वराडकर यांनीही आक्रमक भूमिका घेत नाराजी व्यक्त केली. यावर मंदार केणी, यतीन खोत यांनी विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले.

हा वाद वाढत असल्याने प्रशासनाने गटार खोदाईची नगरसेवकांच्या तक्रारीनुसार पाहणी करून कार्यवाही करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले. पालिकेने निश्चित केलेली पाणीपट्टी दरवाढ सन २०२०-२१ वर्षांसाठी स्थगित करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.

नगरसेवक मंदार केणी यांनी काही कॉम्प्लेक्सधारकांना नळजोडणी दिली जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावर उपनगराध्यक्षांनी थेट तक्रार करून सभागृहात बोलावे. पाणी जोडणी देण्यास कोणालाही विरोध केला नसल्याचे स्पष्ट केले. ज्यांना नळजोडणी हवी आहे त्यांनी पालिकेशी संपर्क साधावा असे नगराध्यक्षांनी सांगितले.नाट्यगृह, भाजी मंडई, फोवकांडा पिंपळ येथील व्यापारी गाळे बंदावस्थेत असल्याने पालिकेचे कोट्यवधीचे उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे अनामत रकमेत सूट देण्यासाठी पालिकेने उपाययोजना करावी, अशी सूचना करण्यात आली. नगराध्यक्ष कांदळगावकर यांनीही प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करावा. आम्ही पालकमंत्र्यांचे लक्ष वेधू, असे सांगितले.शासनाला प्रस्ताव पाठविण्याचा एकमुखी निर्णयनगरसेवक नितीन वाळके यांनी शहरातील पथदिव्यांवर होणारा खर्च व वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यावर पर्याय म्हणून पालिकेच्या कुंभारमाठ येथील हुतात्मा स्मारकाच्या परिसरात सोलर पार्क उभारण्याची सूचना केली. यासाठी महावितरणकडून अनुदान आहे. यामुळे शहराची विजेची गरज भागविता येईल.

उर्वरित वीज महावितरणला विकता येईल. यातून पालिकेला दुहेरी फायदा होईल. त्यामुळे स्वातंत्र्यसेनानी मंजुळाबाई गावकर यांनी शासनाला दान दिलेल्या जागेत हा प्रकल्प करण्याची सूचना केली. तशाप्रकारचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचा एकमुखी निर्णय सभागृहात घेण्यात आला.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग