शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यातील वाद हातघाईवर, दोडामार्गमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 19:02 IST

: गेल्या अनेक दिवसांपासून कसई-दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये माजी नगराध्यक्ष संतोष नानचे व उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्यात सुरू असलेला वाद अखेर रविवारी मासळी विक्रीच्या वादावरून चव्हाट्यावर आला.

ठळक मुद्देमाजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यातील वाद हातघाईवर, दोडामार्गमधील प्रकार : भाजपाअंतर्गत कुरघोडीचे राजकारण, अनेक दिवसांपासून धुमसत होता वाद

दोडामार्ग : गेल्या अनेक दिवसांपासून कसई-दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये माजी नगराध्यक्ष संतोष नानचे व उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्यात सुरू असलेला वाद अखेर रविवारी मासळी विक्रीच्या वादावरून चव्हाट्यावर आला. दोघांमध्येही चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर हा वाद हातघाईवर आला असताना दोघांनाही भाजपाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी बाजूला घेतल्याने त्यावर पडदा पडला. मात्र, भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांतील या चव्हाट्यावर आलेल्या वादळामुळे दोडामार्ग शहर भाजपात काहीच आलबेल नसल्याचे समोर आले.कसई-दोडामार्ग नगर पंचायतीमध्ये भाजपाच्या नगरसेवकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत वाद धुमसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय असो अथवा इतर विकासकामे. या सर्वात भाजपाच्या नगरसेवकांतर्गत धुसफूस पहायला मिळाली.

माजी नगराध्यक्ष संतोष नानचे आणि सध्याचे उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्यात या ना त्या कारणावरून नेहमीत कुरघोडी सुरू असते. त्यामुळे दोडामार्ग शहर भाजपातही अंतर्गत गटबाजी असल्याचे अनेकदा पुढे आले आहे.

मध्यंतरीच्या काळात भाजपाच्या वरिष्ठांकडून मनोमिलन झाल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, तरीदेखील हा वाद उफाळून येत आहे. रविवारी तर हा वाद चव्हाट्यावर आला. त्याला निमित्त ठरले ते मासळी बाजार बंद असताना एक मासे विक्रेत्या महिला विक्री करीत असल्याचे. गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला आहे. तर मासे विक्री व भाजीविक्री रविवारची बंद ठेवण्यात येते.मात्र, रविवारी मासळीबाजार व भाजी मंडई बंद असताना एक मासळी विक्रेती महिला मासे विक्री करताना आढळली. त्यामुळे इतर मासे विक्रेत्यांवर अन्याय का? याचा जाब विचारण्यासाठी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे, माजी सरपंच पांडुरंग बोर्डेकर, बाळा कोरगावकर, प्रकाश काळबेकर आदी भाजपा पदाधिकारी गेले.मुख्याधिकारी शिवराज गायकवाडदेखील यावेळी आले. याच दरम्यान, मासे विक्री करणाऱ्या महिलेसोबत चर्चा सुरू असताना उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण त्याठिकाणी आले. यावेळी योगेश महाले, सुमित म्हाडगुत, रोहन चव्हाण, समीर रेडकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष लवू मिरकर आदी उपस्थित होते.यावेळी नानचे यांनी कोणीही येऊन तुम्हांला मासे विक्री करा असे सांगत असेल तर ते करू नका. नगरपंचायत प्रशासन जे सांगेल ते करा असे सांगितले. याच मुद्यावरून चव्हाण व नानचे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी नानचे यांच्यावर चव्हाण यांनी आरोप केले. 

टॅग्स :PoliticsराजकारणSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग