शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

वाद भाजपच्या मुळावर

By admin | Updated: April 13, 2016 00:11 IST

पंचायत समिती गमावली : आगामी निवडणुका महत्त्वाच्या

शिरीष नाईक - कसई दोडामार्ग पंचायत समितीवर भाजपची सत्ता असतानाही सभापतिपद व उपसभापतिपद ही दोन्ही पदे गेल्याने भाजप गोटात वादळ उठले आहे. भाजपमधील अंतर्गत वाद दोडामार्गमध्ये भाजपच्या मुळावर येतो की काय, अशीच चिन्हे दिसू लागली आहेत. नगरपंचायतीनंतर आता पंचायत समितीवरील सत्ता गेल्याने भाजपवर विरोधात राहून काम करण्याची नामुष्कीची वेळ आली आहे. त्यामुळे भाजप आगामी निवडणुकांमध्ये कशी रणनीती आखते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.दोडामार्ग पंचायत समितीमध्ये भाजपचा एक सदस्य, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन व काँग्रेसचा एक अशी सदस्य संख्या आहे. त्यामुळे कोणालाही बहुमत नव्हते. राष्ट्रवादीकडे दोन सदस्य व एक काँगे्रसचा सदस्य मिळून तीन सदस्य एकत्र आले. तसेच भाजपचे व शिवसेनेचे तीन सदस्य एकत्र आले. ३-३ असे अशी सदस्य संख्या झाली होती.राष्ट्रवादीच्या सदस्या सुचिता दळवी यांना सभापती बनवावे, असे काँग्रेस-राष्ट्रवादीने ठरविले. मात्र, निवडणुकीच्यावेळी काँग्रेसचे महेश गवस हे गैरहजर राहिले. त्यामुळे दळवी यांचा पत्ता कट झाला. भाजप-सेनेने युती करत सभापतिपद भाजपच्या सीमा जंगले, तर उपसभापतिपद शिवसेनेचे आनंद रेडकर यांना सोपविण्यात आले. मध्यंतरातील राजकीय घडामोडीनंतर पंचायत समितीचे समीकरण बदलले. भाजप-सेनेत अंतर्गत वाद झाले. सेनेचे जनार्दन गोरे हे काँगे्रसवासीय झाले, तर राष्ट्रवादीच्या सदस्या विशाखा देसाई शिवसेनेत गेल्या. भाजपने सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी राजेंद्र म्हापसेकर यांनी काँग्रेसचे सदस्य महेश गवस व सेनेचे सदस्य आनंद रेडकर यांना फोडून भाजपत प्रवेश करून घेतला. भाजपकडे तीन सदस्य झाले. सभापती निवडीवेळी काँगे्रस-राष्ट्रवादी व शिवसेनेने भाग घेतला नाही. त्यामुळे सभापती व उपसभापती पद ही दोन्ही पदे भाजपकडे राहिली. परस्पर भाजपने आपला मित्रपक्ष शिवसेनेचा काटा काढला. तो राग शिवसेनेला होता. तसेच सुचिता दळवी यांचे सभापतिपद महेश गवस यांच्यामुळे हुकले होते. तो रागही राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी यांच्या मनात होता. तर काँग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांना सभापतींच्या खुर्चीवर बसले म्हणून पत्रकबाजी करून पोलिस ठाण्यापर्यंत तक्रार नेल्याने महेश गवस यांचा काटा कसा काढावा, याची व्यूहरचना राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने केली. योग्य संधीची ते वाट पाहत होते. महेश गवस यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी पाच सदस्य एकत्र आले. या संधीचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या मर्जीतले सदस्य माजी सभापती सीमा जंगले यांना काँग्रेसने फोडले, तर उपसभापती आनंद रेडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतला आणि भाजपला अचानक झटका दिला. त्यामुळे भाजपच्या गोटात वादळ उठले. सभापती महेश गवस मनमानी कारभार करतात, म्हणून पाच सदस्यांनी गवस यांच्याविरूध्द अविश्वास ठराव आणला. तो ४ विरूध्द १ ने मंजूर झाला. त्यामुळे महेश गवस यांचे सभापती पद गेले. निवडणुकीच्यावेळी सीमा जंगले यांनी तटस्थ राहत मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही. तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीची खेळी यशस्वी झाली. त्यामुळे आता राजकीय बलाबल राष्ट्रवादी-२ सदस्य, काँग्रेस-२, भाजपा-२ व शिवसेना-० असे झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे चार सदस्य असल्याने बहुमताचा आकडा झाला आहे. भाजपचे उपसभापती आनंद रेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने उपसभापती पद काँग्रेसकडे गेले आहे. सभापती पद रिक्त राहिल्याने त्याजागी राष्ट्रवादीच्या सुचिता दळवी यांची वर्णी लागणार आहे. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँगे्रस-राष्ट्रवादीलाच बहुमत मिळेल, अशी चर्चा जोर धरत आहे. दोन्ही ठिकाणची सत्ता गेलीकसई दोडामार्ग नगरपंचायतीवर भाजपा-सेनेला बहुमत मिळाले होते. मात्र, नगराध्यक्षपदावरून भाजपा-सेनेमध्ये वाद झाले. काँग्रेसने भाजपाच्या रेश्मा कोरगावकर व सेनेच्या संध्या प्रसादी या दोन नगरसेवकांना गळाशी लावत व एका अपक्ष उमेदवाराची मदत घेत काँगे्रस-राष्ट्रवादीने काँग्रेसचे संतोष नानचे यांना नगराध्यक्ष केले व भाजपा-शिवसेनेला पाणी पाजले. एकंदरीत भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मी पणाच्या भांडणात नगरपंचायत व पंचायत समिती या दोन्ही ठिकाणची सत्ता गेली आहे. राज्यात व केंद्रात सत्ता असताना दोडामार्गात ही घट भाजपला आत्मपरीक्षण करण्यास पुरेशी आहे.