शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदूर्ग : बंदरजेटी येथील गाळ उपशाचे मुंबईतील बैठकीत आदेश, किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 14:24 IST

किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या समस्यांसंदर्भात पालकमंत्री, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी व प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

ठळक मुद्देबंदरजेटी येथील गाळ उपशाचे मुंबईतील बैठकीत आदेश किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चादोन दिवसांत गाळ उपसा काम होणार सुरू

मालवण : किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या समस्यांसंदर्भात पालकमंत्री, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी व प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

यात प्रमुख मागण्यांपैकी बंदर जेटीकडील गाळ काढण्याच्या कामास कार्यारंभ आदेश देण्यात आला असून त्याचे काम येत्या दोन दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी दिली.सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने विविध समस्या व मागण्यांसंदर्भात किल्ला प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. यावर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या मागण्यांसंदर्भात मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक घेऊन समस्या सोडविल्या जातील असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार ९ व १० जानेवारीला मुंबईत बैठक झाली.

या बैठकीस पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी, किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश सावंत, स्वप्नील आचरेकर, बाळा तारी, राजू पराडकर, संजय नार्वेकर, अंतोन डिसोझा, आशिष जोगी आदी उपस्थित होते.तसेच सर्व्हे प्रमाणपत्रासाठी मुंबईच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याने व्यावसायिकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यासंदर्भात मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधितांना जिल्हा स्तरावर शिबिर घेऊन आॅनलाईन सर्व्हे प्रमाणपत्र देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. होडी वाहतूक संघटनेच्या अन्य मागण्याही टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले, अशी माहितीही मंगेश सावंत यांनी दिली.दोन दिवसांत गाळ उपसा काम होणार सुरूबैठकीत किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. यात जेटीकडील गाळाचा उपसा करण्याची प्रमुख मागणी होती. ही मागणी तत्काळ मान्य करताना या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. येत्या दोन दिवसांत गाळ उपसा करण्याचे काम सुरू होणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गboat clubबोट क्लब