शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मळेवाड सरपंचांवरील अविश्वास ठराव नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 10:57 IST

मळेवाड-कोंडुरे सरपंच सचला केरकर यांच्यावरील अविश्वास ठराव अखेर नामंजूर करण्यात आल्याने गेले काही दिवस चाललेल्या सरपंचांविरुद्धच्या अविश्वास ठराव घडामोडींना पूर्णविराम मिळाला आहे. अकरा सदस्यांची संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीसाठी अविश्वास ठरावासाठी नऊ सदस्यांची गरज होती. मात्र, दोन सदस्य यावेळी अनुपस्थित राहिल्याने विरोधकांची संख्या फक्त आठ असल्याने अविश्वास ठराव फेटाळण्यात आला.

ठळक मुद्देमळेवाड सरपंचांवरील अविश्वास ठराव नामंजूरभाजपकडून अभिनंदन : दोन सदस्य मतदानावेळी अनुपस्थित

आरोंदा : मळेवाड-कोंडुरे सरपंच सचला केरकर यांच्यावरील अविश्वास ठराव अखेर नामंजूर करण्यात आल्याने गेले काही दिवस चाललेल्या सरपंचांविरुद्धच्या अविश्वास ठराव घडामोडींना पूर्णविराम मिळाला आहे. अकरा सदस्यांची संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीसाठी अविश्वास ठरावासाठी नऊ सदस्यांची गरज होती. मात्र, दोन सदस्य यावेळी अनुपस्थित राहिल्याने विरोधकांची संख्या फक्त आठ असल्याने अविश्वास ठराव फेटाळण्यात आला.केरकर यांच्यावरील अविश्वास ठरावासंदर्भातील बैठकीचे आयोजन सोमवारी दुपारी ३ वाजता करण्यात आले होते. या बैठकीला सरपंचांसह एकूण नऊ सदस्य उपस्थित होते. एकूण अकरा सदस्यांपैकी पूजा मसुरकर व वैष्णवी परब हे सदस्य उपस्थित नसल्याने अविश्वास ठराव नाट्याला वेगळेच वळण मिळाले.सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी बैठकीला सुरुवात करून बैठकीबाबत सदस्यांना कल्पना व समज दिली. अविश्वास ठरावासाठी सरपंचांविरोधात आठ सदस्यांनी हात वर केले. अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी एकूण सदस्य संख्येच्या तीन चतुर्थांश सदस्यांनी आवश्यकता असल्याने अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी नऊ सदस्यांची गरज होती. मात्र, दोन सदस्य अनुपस्थित राहिल्याने अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आला. तहसीलदारांनी अविश्वास ठराव फेटाळल्याचे सांगितले.सरपंचांनी विरोधातील सदस्यांनी अविश्वास ठरावास दोन सदस्य अनुपस्थित राहिल्याने घोडाबाजार झाल्याची प्रतिक्रिया सभागृहातून बाहेर पडल्यावर व्यक्त केली. हा अविश्वास ठराव बारगळल्यानंतर पाच सदस्यांनी आपले राजीनामे सादर केले. यात उपसरपंच दिलीप मुळीक, सदस्य स्वाती सातार्डेकर, नंदू नाईक, दीपिका मुळीक, भगवान मुळीक यांचा समावेश आहे. 

टॅग्स :BJPभाजपाsarpanchसरपंचsindhudurgसिंधुदुर्ग