शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

केसरकरांनी राणेंच्या दहशतवादाचा बागुलबुवा करून जनतेची फसवणूक केली; सुषमा अंधारेची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 23:54 IST

सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी नुसता केंद्रीय मंत्री नारायण राणे याच्या दहशतवादाचा बागुलबुवा करून जिल्हावासियामध्ये संभ्रम ...

सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी नुसता केंद्रीय मंत्री नारायण राणे याच्या दहशतवादाचा बागुलबुवा करून जिल्हावासियामध्ये संभ्रम निर्माण केला आणि ते जेव्हा सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाले तेव्हा सर्वात जास्त ठेके हे माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणेंना यानाच दिले असा गंभीर आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

केसरकर जरी राणेचा दहशतवाद संपला म्हणून सांगत असले तरी तो सत्तेसाठी असून दोघे मिळून सिंधुदुर्ग विकून खाऊ हेच यामागचे त्याचे धोरण असल्याची टिका ही अंधारे यांनी यावेळी केली.त्या बुधवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.यावेळी शिवसेना उपनेत्या संजना घाडी,जिल्हाप्रमुख संजय पडते,रूपेश राऊळ,जान्हवी सावंत,चंद्रकांत कासार,चंद्रकांत गावडे,मायकल डिसोजा आदि उपस्थित होते.

अंधारे म्हणाल्या,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काहि नेते पक्ष सोडून गेले असले तरी कार्यकर्ता हा तिथेच आहे.  मंत्री केसरकर यांच्या छुपा दहशतवाद सर्वाना कळून चुकला आहे.आता पर्यत रोजगाराची अनेक आश्वासने त्यांनी दिली पण प्रत्यक्षात काथ्या कारखाना,चष्म्याच्या कारखान्याचे काय झाले ते सांगू शकले नाहीत.आता येथील जनता केसरकर यांच्या भुलभुलेय्याना फासणारी नाही.निवडणुकीत योग्य उत्तर देणार आहे.दहशतवाद म्हणून ओरड मारून मते घेतली आणि आता तेच राणेचा दहशतवाद संपला म्हणतात मग हा दहशतवाद सत्तेसाठी संपला म्हणायचा का?म्हणजे सत्तेसाठी दोघे मिळून सिंधुदुर्ग विकून खाऊ असेच यांचे धोरण असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला आहे. केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असतना अनेक ठेके  राणेंनाच देत असत मग दहशतवाद कसला म्हणायचा असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.जे 40 आमदार सोडून गेले आहेत त्यातील अनेक जण आमच्या सर्पकात आहेत.त्यात मंत्री दीपक केसरकर नाहीत कारण ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरही थांबणार नसून भाजपात जाणार असल्याचा गौप्यस्फोट अंधारे यांनी केला आहे.

राष्ट्रीय राजकारणात भाजप विरोधी मोठ बांधायची आहे.शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्या मागे मुंबई महानगरपालिका ऐवढे छोटे कारण नसून ते राष्ट्रीय राजकारणात सर्व युवा चेहरे एकत्र येऊन भाजप विरोधी एक मोठ बांधणे गरजेचे आहे.जे देशात राजकारण सुरू आहे.ते थांबवण्याची गरज असून सगळे युवा चेहरे एकत्र आल्यास नक्कीच त्यात बदल होईल.कर्नाटकने घेतलेला निर्णय म्हणजे भाजपची कुटील नितीकर्नाटक सरकार ने सांगली जिल्ह्य़ातील 40 गावावर दावा सांगितला तो दावा म्हणजे भाजप च्या राजकारणाचा कुटील डाव असून,हे कुठेतरी थांबले पाहिजे जे 40 जण शिवसेनेतून गेले आहेत ते गप्प का? बसले आहेत ते दिल्लीतील अमराठी नेत्यासमोर गप्प का बसतात असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या संजना घाडी यांनी केला आहे.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेDeepak Kesarkarदीपक केसरकर