शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वायंगणी गावाची आज देवपळण

By admin | Updated: March 14, 2016 00:23 IST

शेकडो वर्षांची परंपरा : तीन दिवस, तीन रात्रीसाठी गाव वेशीबाहेर

मालवण : तालुक्यातील वायंगणी गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथाची दर तीन वर्षांनी होणारी देवपळण सोमवार १४ मार्चपासून सुरु होत आहे. ही देवपळण १६ मार्चपर्यंत अशी तीन दिवस आणि तीन रात्री असणार आहे. तीन दिवसाच्या कालावधीत सर्व गावकरीही तीन दिवस वेशीबाहेर थांबणार आहेत. गुरुवार १७ रोजी देवाला प्रसाद लावून गावात परतण्यासाठी कौल घेतला जाणार आहे. आज पहाटे देव वेशीबाहेर चिंदर सडेवाडी येथे जाणार असून दुपारी २ वाजेपर्यंत अख्खे गावही सुनेसुने होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याने पर्यटनात कात टाकली असली तरी येथील लोक श्रद्धेच्या प्रतिक असलेल्या रूढी-परंपरात खंड पडू देत नाही. गावपळण आणि देवपळण ही एक अशीच परंपरा आहे की जी गावाचा सांभाळ करणाऱ्या ग्रामस्थांचा नवचैतन्य देणारी, उत्साह वाढविणारी असते. मालवण तालुक्यात प्रामुख्याने आचरा व चिंदर गावची गावपळण होते. अशीच एक आणखीन देवपळण एक प्रथा तालुक्यातील वायंगणी गावात शेकडो वर्षे सुरु आहे. गावात शांतता, एकी नांदावी तसेच गावकरी मंडळी गुण्यागोविंदाने नांदावेत या उद्दात हेतूने देवपळण केली जाते. यामागे कोणतीही अंधश्रद्धा नसून प्रत्येक गावकऱ्याला स्फूर्ती देणारा तो क्षण असतो, असे गावकरी सांगतात.मालवण - आचरा मार्गावरील वायंगणी गाव वसलेले आहे. देवपळणीच्या कालावधीत गावाच्या सर्व वेशीवर गावकऱ्यांचा एकीचा गजबजाट असतो. कालावल पुलाखाली किनाऱ्यालगत बांधण्यात येणाऱ्या राहुट्या लक्षवेधी ठरतात. विशेषत: रात्रीच्या मंद प्रकाशात लिकलिकणारा उजेड आल्हाददायक असतो. ग्रामस्थ तीन दिवसांसाठी पुरेल एवढा धान्यसाठा व अन्य साहित्य गोळा करतात. माणसांबरोबर पाळीव प्राण्यांनाही आपल्या सोबतीला आणले जाते. देवपळणीबाबत पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणेसह सर्व प्रशासकीय यंत्रणाही कळविण्यात येते.(प्रतिनिधी) १७ रोजी परतीचा कौलश्री देव रवळनाथाची डाळपस्वारी झाल्यावर देव देवपळणीचा कौल देतो. त्यानुसार देवपळणीचा दिवस निश्चित केला जातो. गावकऱ्यांसाठी उत्सवासारखा असणारा सण 'याचि देही याचि डोळा' पाहण्यासाठी चाकरमानीही गावात दाखल होतात. तीन दिवसीय देवपळण उत्सवात गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होतात. साधारणपणे १८०० लोकवस्ती असलेले वायंगणी गाव देवपळणीच्या तीन दिवासात वेशी बाहेर अथांग आभाळाच्या छताखाली नांदतात. १४ पासून सुरु होणाऱ्या या देवपळणीचा परतीचा कौल १७ मार्च रोजी सकाळच्या सत्रात होणार आहे. गावकरी देवाच्या सहवासातदेवपळणीत देव रवळनाथ चिंदर सडेवाडी-गोसावीवाडी येथे वास्तव्यास जातो. त्याठिकाणी असलेल्या घुमटीत देवाचे श्रीफळ ठेवून त्याची पूजा-अर्चा केली जाते. यावेळी मात्र गावातील एकही मंदिरात पूजा केली जात नाही. त्यामुळे देवांच्या सान्निध्यात राहण्याचा ग्रामस्थांचा मानस असतो. गावातील जास्तीत जास्त गावकरी देवाच्या सहवासात तीन दिवस, तीन रात्री घालवितात. झोपडीवजा किंवा राहुट्या उभ्या करून निसर्गाच्या कुशीत ग्रामस्थ वास्तव्य करतात. त्याठिकाणी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात गावकऱ्यांमुळे अधिक रंग येतो.