शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

देवगड जामसंडे नगरपंचायत स्वीकृत नगरसेवकपदी विश्वमित्र खडपकर

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 20, 2023 16:07 IST

देवगड ( सिंधुदुर्ग ) : देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी विश्वमित्र चंद्रकांत खडपकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीची ...

देवगड (सिंधुदुर्ग) : देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी विश्वमित्र चंद्रकांत खडपकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीची विशेष सभा बुधवारी पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याधिकारी सूरज कांबळे यांच्या उपस्थितीत नगरपंचायत कार्यालयात झाली.देवगड जामसंडे नगर विकास समिती या गटातील नामनिर्देशित सदस्य रवींद्र प्रभाकर चिंदरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने जागा रिक्त होती. या जागी नूतन नामनिर्देशित सदस्य नियुक्त करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तथा उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच देवगड जामसंडे नगरपंचायतचे मुख्याधिकारी सूरज कांबळे यांच्या उपस्थितीत आज सकाळी ११ वाजता आयोजित केलेल्या विशेष सभेत नगर विकास समिती गटाचे गटनेते शरद ठुकरुल यांनी नामनिर्देशपदासाठी विश्वमित्र खडपकर यांचा एकमेव अर्ज सादर केला.त्यासाठी नावाचे शिफारस पत्र सादर केले. नामनिर्देशनपत्र वैध असल्याचे घोषित केले. प्राप्त झालेले विश्वमित्र चंद्रकांत खडककर यांचे नामनिर्देशनपत्र वैध असल्यामुळे विश्वमित्र चंद्रकांत खडपकर यांचे देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती झाल्याची पीठासन अधिकारी यांनी घोषित केले.निवड जाहीर होताच माजी आमदार अजित गोगटे, भाजप जिल्हा कार्यकारिणी निमंत्रित सदस्य बाळ खडपे, युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, गटनेते शरद ठुकरुल, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, प्रदीप साळसकर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, अन्य सर्व नगरसेवक नगरसेविका भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्यांचे कौतुक केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गElectionनिवडणूक