शहरं
Join us  
Trending Stories
1
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
2
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
3
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
4
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
5
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
6
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
7
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
8
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
9
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
10
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
11
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
12
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
13
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
14
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
15
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
16
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
17
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
18
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश
19
भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद
20
७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी

देवस्थानचा जमीनप्रश्न मार्गी लावणार

By admin | Updated: July 20, 2015 00:07 IST

वैभव नाईक : आचरा ग्रामस्थांशी समस्यांवर केली चर्चा

आचरा : आचरा गावाचा उभा राहिलेला देवस्थान जमीनप्रश्न सोडवण्यासाठी आपण ग्रामस्थांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असून देवस्थान जमीनप्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन संपल्यानंतर महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याशी आचरा ग्रामस्थांबरोबर बैठक घेवून देवस्थान जमीन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी दिले.यावेळी सरपंच मंगेश टेमकर, राजन गावकर, समीर हडकर, अरुण आपकर, शामसुंदर घाडी, विनायक परब, रेश्मा कांबळी, बबन सक्रू, उदय दुखंडे, अरविंद घाडी, जगदीश पांगे आदी उपस्थित होते. यावेळी आचरा ग्रामस्थांनी आमदार नाईक यांच्याकडे देवस्थान जमीनविषयक समस्या मांडल्या. यावेळी माजी उपसरपंच अरुण आपकर यांनी बेदखल कुळाबाबत लक्ष वेधले.आचरा पारवाडी भागातील ७० ते ७५ शेतकरी हे शेकडो वर्षे जमीन कसत असून त्यांची सातबारावर नावे नाहीत. शेकडो वर्षे जमीन कसूनही कूळ म्हणून नाव नसल्याने या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. या शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जातील अशी त्यांनी भीती व्यक्त केली.यावेळी जगदीश पांगे यांनी कमिटीदार हे पैसे मागत असल्याचा आरोप करत म्हणाले, आम्ही ग्रामपंचायतीकडून रितसर परवानगी घेऊन इमारत बांधली. असे असूनही देवस्थान कमिटी आमच्यावर केसेस टाकत असून प्रत्येक स्क्वेअर फुटमागे ५०० रुपयांची मागणी करत आहेत. कोणताही अधिकार नसताना जमीन एनए करुन देण्याचे आश्वासन देत आहेत. या सगळ्याचा विचार करुन आमदारांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली.यावेळी आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीने जमीनप्रश्नी चर्चा करण्याचे सांगत ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा येऊ देणार नसल्याचे आश्वासन देत आचरा गावाच्या विकासासाठी आपण बांधील असून देवस्थान जमीनमुळे निर्माण झालेले, जमीन तारण खरेदी-विक्री, जमीन एनए करण्याचे प्रश्न शासन स्तरावर तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले.यावेळी आमदार नाईक यांनी आचरा जिल्हा परिषद विभागातील कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन विकासकामाबाबत चर्चा केली. (वार्ताहर)