शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मडुरा परिसरात आता गव्यांकडून तरव्याची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 14:45 IST

मडुरा परिसरात मगरींची दहशत असताना आता गव्यांनी आपला मोर्चा भात लावणी केलेल्या तरव्याकडे वळविला आहे. गव्यांनी तरव्याची नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. मडुरा चवडीवाडी येथील दीपक जाधव, नाना मोरजकर, प्रकाश मोरजकर, प्रकाश पंडित या शेतकऱ्यांच्या शेतीचे यात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता खायचे काय? असा प्रश्न त्यांना पडला आहे.

ठळक मुद्देमडुरा परिसरात आता गव्यांकडून तरव्याची नासधूसशेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान

बांदा : मडुरा परिसरात मगरींची दहशत असताना आता गव्यांनी आपला मोर्चा भात लावणी केलेल्या तरव्याकडे वळविला आहे. गव्यांनी तरव्याची नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. मडुरा चवडीवाडी येथील दीपक जाधव, नाना मोरजकर, प्रकाश मोरजकर, प्रकाश पंडित या शेतकऱ्यांच्या शेतीचे यात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता खायचे काय? असा प्रश्न त्यांना पडला आहे.दिवसेंदिवस मडुरा पंचक्रोशीत गव्यांचा उपद्रव वाढत आहे. तरवा लावणीयोग्य झाला असतानाच गव्यांनी त्याची नासधूस केली आहे. शेतीची नासधूस करणाऱ्या गव्यांविरोधात कोणतीच कार्यवाही केलेली दिसत नाही. वनविभाग फक्त पंचनामा करण्याचे काम करीत आहे. परंतु योग्य ती उपाययोजना कोणी करीत नसल्याने शेतकऱ्यांचा वाली कोण? आम्ही शेती तरी कशी करायची? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.शेती हा येथील मुख्य व्यवसाय आहे. वर्षभर पुरेल एवढे भात पिकविले जाते. परंतु शेतीच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या तरव्याचे गव्यांनी नुकसान केल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. प्रशासन एकीकडे युवकांना शेतीकडे वळा, असे आवाहन करीत नवनवीन योजना आणताना दिसत आहे. शेतकऱ्यांना शेतीविषयक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करणाऱ्या प्रशासनाने आधी गव्यांचा बंदोबस्त करावा. नंतरच नवनवीन योजनांची घोषणा करावी,अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग