शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कसाल ते झाराप मार्गावर आवश्यक सुविधांची केंद्राकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 16:35 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात तालुक्यातील कसाल ते झाराप या मार्गावर आवश्यक असलेल्या सुविधांबाबतच्या मागण्या केंद्र्राकडे पाठविण्यात येणार असून, तेथून अंतिम मंजुरी मिळेल, अशी माहिती महामार्गाचे मुख्य कार्यकारी अभियंता वि. सु. देशपांडे यांनी कुडाळ तालुका बचाव समितीशी झालेल्या बैठकीत दिली. यावेळी देशपांडे यांनी समितीच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शविली.

ठळक मुद्देकसाल ते झाराप मार्गावर आवश्यक सुविधांची केंद्राकडे मागणीमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण : वि. सु. देशपांडे यांची माहिती

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात तालुक्यातील कसाल ते झाराप या मार्गावर आवश्यक असलेल्या सुविधांबाबतच्या मागण्या केंद्र्राकडे पाठविण्यात येणार असून, तेथून अंतिम मंजुरी मिळेल, अशी माहिती महामार्गाचे मुख्य कार्यकारी अभियंता वि. सु. देशपांडे यांनी कुडाळ तालुका बचाव समितीशी झालेल्या बैठकीत दिली. यावेळी देशपांडे यांनी समितीच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शविली.चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर कुडाळ तालुका बचाव समितीने कसाल ते झारापपर्यंत ग्रामस्थांना सोयीस्कर ठरतील अशा विविध मागण्या केल्या. या संदर्भात अ‍ॅड. निलेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे या महामार्गाचे मुख्य कार्यकारी अभियंता देशपांडे यांच्याशी सभा आयोजित केली होती.यावेळी बचाव समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. राजीव बिले, काका कुडाळकर, गजानन कांदळगावकर, महेश पावसकर उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत कुडाळ येथे हॉटेल राज पॅलेस दरम्यान उड्डाण पूल करणे, त्याच्या सुरुवातीपासून शहरात वाहने येण्या-जाण्याचा मार्ग मोकळा करण्यात यावा, तेर्सेबांबर्डे-मळावाडी येथे अंडरपासबाबत देशपांडे यांनी स्वत: पाहणी करून निर्णय घेण्याचे ठरविले. सरसकट सेवारस्त्याबाबत मात्र त्यांनी आवश्यकतेनुसार काही बदल करण्याबाबत विचार करण्याचे मान्य केले.कसाल हायस्कूलकडील अंडरपास रस्त्याबाबत विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची ग्वाही देशपांडे यांनी दिली. शेतकऱ्यांसाठी आवश्यक अंडरपासऐवजी आवश्यक तेथे दुभाजकाच्या ठिकाणी रेफ्युजी एरिया करण्याचे मान्य केले. त्यामुळे सुरक्षितरित्या मध्यभागी थांबता येणार आहे.पावशी येथील लिंग मंदिर वाचविण्याबाबत आवश्यक बदली जागा गावकऱ्यांनी दिल्यास निर्णय घेता येईल, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले. कुडाळ शहरातील सत्यम हॉटेल येथील बस मार्ग देण्याबाबत मागणी केली असता शहरातच योग्य त्या ठिकाणी बस मार्ग देण्याचे मान्य केले. कसाल ते झाराप या दरम्यान काही बस थांबे वाढवून मिळावेत, या मागणीवर एसटी प्रशासनाशी चर्चा करून योग्य त्या ठिकाणी बस थांबे देण्याचे मान्य केल्याचे बचाव समितीच्या सदस्यांनी सांगितले.

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग