शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : डाटा आॅपरेटरांचे मानधन खात्यात जमा करण्याची मागणी : वैभव नाईक यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 15:18 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील डाटा आॅपरेटरांचे रखडलेले मानधन व ग्रामपंचायत पथदीप बिलांच्या प्रश्नाबाबत आमदार वैभव नाईक यांनी मंत्रालयात ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे व ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांची भेट घेऊन लक्ष वेधले.

ठळक मुद्देडाटा आॅपरेटरांचे मानधन खात्यात जमा करण्याची मागणीवैभव नाईक यांची माहिती : ग्रामविकास मंत्र्यांचे लक्ष वेधले

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील डाटा आॅपरेटरांचे रखडलेले मानधन व ग्रामपंचायत पथदीप बिलांच्या प्रश्नाबाबत आमदार वैभव नाईक यांनी मंत्रालयात ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे व ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांची भेट घेऊन लक्ष वेधले.

डाटा आॅपरेटरांचे मानधन ग्रामविकास विभागाकडून थेट डाटा आॅपरेटरांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली असून, यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री भुसे यांनी दिल्याची माहिती आमदार नाईक यांनी दिली.ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पांतर्गत डाटा एंट्री आॅपरेटर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानधन ग्रामपंचायत सीएससी एसपीव्ही या कंपनीस वर्ग करते. मात्र, ते मानधन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होते.

ही बाब आमदार वैभव नाईक यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे व ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी मानधन थेट डाटा आॅपरेटरांच्या खात्यात जमा करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.यावेळी ग्रामपंचायतींच्या पथदीप बिलांचा प्रश्नही आमदार नाईक यांनी उपस्थित केला. ग्रामपंचायतीमार्फत लावण्यात आलेल्या पथदिव्यांचे बिल न भरल्याने महावितरण विभागाकडून ग्रामपंचायतींना नोटिसा आल्या आहेत.

ग्रामपंचायतींचे उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांना हे बिल भरणे शक्य होत नाही. त्यामुळे हे बिल ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात यावे, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली. यावरही मंत्री भुसे यांनी सकारात्मक चर्चा करून त्यासंदर्भात आदेश काढण्यात येतील तसेच ग्रामपंचायतींचे पथदीप बंद होणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल, असे सांगितले.

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग