शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

जीवे मारण्याच्या प्रयत्नप्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 5:03 PM

धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या आकेरी गावडेवाडी येथील लक्ष्मण मधुकर नाईक (४०) याचा जामीन अर्ज ओरोस येथील जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी फेटाळून लावला आहे.

ठळक मुद्देजीवे मारण्याच्या प्रयत्नप्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळलाधारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

सिंधुदुर्गनगरी : धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या आकेरी गावडेवाडी येथील लक्ष्मण मधुकर नाईक (४०) याचा जामीन अर्ज ओरोस येथील जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्रन्यायाधीश आर. बी. रोटे यांनी फेटाळून लावला आहे.नाईक बंधूंनी आपल्या शेतातील पाण्याचे पाट फोडल्याने ते पाणी पाटील यांच्या घराकडे येत होते. याबाबत तक्रारदार रुपेश कृष्णाजी पाटील यांच्या आईने त्यांना विचारणा केली होती. याचा राग आल्याने रुपेश पाटील हे कामळेवीर बाजारपेठेत असताना लक्ष्मण व परशुराम नाईक यांनी त्यांना झटापट करून शिवीगाळ केली होती. तसेच तेथील एका चुना विक्रेत्याच्या दुकानातील चुना ढवळण्याचे लोखंडी धारदार हत्यार घेऊन लक्ष्मण याने डोक्यावर मारले होते. तर परशुराम याने पाटील यांना धरून ठेवले होते.२१ जुलै २०१९ रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत बाजारपेठेत घडलेल्या या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रुपेश पाटील यांनी याबाबत कुडाळ पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून नाईक बंधूंना अटक करण्यात आली होती. २४ जुलैपर्यंत कुडाळ न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर न्यायालयीन  कोठडी मंजूर केली होती. दरम्यान, यातील लक्ष्मण नाईक याने जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता.हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने संशयितास जामीन दिल्यास संंबंधितांवर दबाव येण्याची शक्यता असल्याने जामीन नाकारण्यात यावा, अशी मागणी सरकार पक्षाने केली होती. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयsindhudurgसिंधुदुर्ग