शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात दीपोत्सव, आकर्षक रोषणाई : सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 12:54 IST

मनमोहक पणत्या, तोरणे, आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा आणि नयनरम्य अशी आरास कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसून येत आहे. दीपोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सर्वत्र पहायला मिळत आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात दीपोत्सव, आकर्षक रोषणाई सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

कणकवली : मनमोहक पणत्या, तोरणे, आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा आणि नयनरम्य अशी आरास कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसून येत आहे. दीपोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सर्वत्र पहायला मिळत आहे.सर्वात मोठा सण असलेल्या दीपोत्सव पर्वास सुरुवात झाली असून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा रंगीबेरंगी प्रकाशात उजळून निघाला आहे. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असे दीपावलीतील एकेक सण दररोज साजरे करण्यासाठी घरोघरी तयारीही पूर्ण झाली आहे. तर अनेक ठिकाणी बच्चे कंपनी किल्ला बनविण्यात गर्क झाली असल्याचे दिसून येत आहे.दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे. पाच दिवस चालणाऱ्या उत्सवाचे वेध महिनाभर अगोदरपासूनच लागलेले असतात. फराळ, कपडे, धार्मिक विधी अशा अनेक कामांची घाई झालेली असते. त्यासाठी विविध प्रकारची खरेदी केली जाते. मात्र, वाढत्या महागाईमुळे ग्राहकांना खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागत आहे. सर्व बाजारपेठा दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याने सजल्या आहेत. गृहोपयोगी वस्तू, कपडे, फळे, फुले अशी विविध प्रकारची खरेदी सहकुटुंब केली जात असल्याचे सध्या दिसत आहे.नरक चतुर्दशी मंगळवारी साजरी करण्यात आली. सूर्योदयापूर्वी अनेक ठिकाणी नरकासुराच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच एकमेकांना फराळाचे निमंत्रण देऊन करंज्या, लाडू, चकली, चिवडा अशा फराळाचा आस्वाद घेण्यात आला. सुमधुर गीतांचा दिवाळी पहाट कार्यक्रमही अनेक ठिकाणी या दिवशी झाला.बुधवारी लक्ष्मीपूजन आहे. त्यासाठी मंगळवारीच तयारी करण्यात येत होती. तसेच दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेसाठी खरेदी करण्यात येत होती. यावर्षी दिवाळी तब्बल पाच दिवसांची असल्याने उत्सवाचा गोडवा वाढणार आहे. त्यानिमित्त घरोघरी दीप उजळले आहेत. विद्युत माळांमुळे रोषणाईत भर पडली आहे. वर्षभरातील थकवा दूर सारून आता सारेजणच दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी सज्ज झाले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी भात कापणीची लगबग सुरू आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळीsindhudurgसिंधुदुर्ग