वैभववाडी : अमरावती वनविभागात परिक्षेत्र अधिकारी पदावर काम करणाऱ्या दिपाली चव्हाण यांनी स्वतःला गोळी मारुन आत्महत्या केली. परंतु तिला तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. त्यामुळे तिच्या आत्महत्सेस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी बेलदार भटका समाज संघ महाराष्ट्र यांच्यावतीने करण्यात आली आहे.येथील संभाजी चौकात दिपाली चव्हाण यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच वरिष्ठांनी त्रास देऊन आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप करीत त्यांचा निषेधही नोंदवला. यावेळी बेलदार समाजाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, राज्य सल्लागार मारुती मोहीते, जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण, कोकण युवा अध्यक्ष संतोष पवार, प्रकाश पवार, रोहीदास पवार, मंगेश चव्हाण, चंद्रकात चव्हाण, विष्णू चव्हाण, रमेश चव्हाण, अनिल जाधव, मनिषा चव्हाण, सुरेखा चव्हाण, दर्शना पवार, सविता पवार, अंकिता मोहीते, सुलोचना पवार, मयुरी चव्हाण यांसह अन्य समाजबांधव उपस्थित होते.हरिसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून दिपाली चव्हाण ही महिला कार्यरत होती. तिने २५ मार्चला स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. परंतु तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे तिने लिहुन ठेवलेली चिठ्ठी आणि ऑडीओ क्लिपवरून स्पष्ट होत असल्याचे बेलदार भटका समाजाचे म्हणणे आहे. तिच्या मृत्यूस वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार, आणि वरिष्ठ अधिकारी रेड्डी हे कारणीभूत आहेत, असा आरोप बेलदार समाजाच्यावतीने करण्यात आला.
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : आत्महत्येस जबाबदार वरिष्ठांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 16:54 IST
Deepali chavan ForestDepartment Sindhudurg-अमरावती वनविभागात परिक्षेत्र अधिकारी पदावर काम करणाऱ्या दिपाली चव्हाण यांनी स्वतःला गोळी मारुन आत्महत्या केली. परंतु तिला तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. त्यामुळे तिच्या आत्महत्सेस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी बेलदार भटका समाज संघ महाराष्ट्र यांच्यावतीने करण्यात आली आहे.
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : आत्महत्येस जबाबदार वरिष्ठांवर कारवाई करा
ठळक मुद्देदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : आत्महत्येस जबाबदार वरिष्ठांवर कारवाई करा बेलदार भटका समाजाची मागणी