शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

फोडाफोडीचे राजकारण सिद्ध झाल्यास राजीनामा देईन : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 19:49 IST

मी कधीही फोडाफोडीचे राजकारण केले नाही व करणारही नाही. शिवसेना-भाजप युती अभेद्य राहिली पाहिजे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मी आपलेच मानतो. कोणीही बुद्धिभेद करण्याचे काम करू नये, असा टोला माजी आमदार राजन तेली यांचे नाव न घेता राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. यावेळी त्यांनी भाजपचा एक जरी कार्यकर्ता फोडला असा आरोप सिद्ध झाल्यास पक्षाचा राजीनामा देईन, असे आव्हान भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्दे फोडाफोडीचे राजकारण सिद्ध झाल्यास राजीनामा देईन  : दीपक केसरकर माझ्याविरोधात बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न; दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपलेच मानतो

सावंतवाडी : मी कधीही फोडाफोडीचे राजकारण केले नाही व करणारही नाही. शिवसेना-भाजप युती अभेद्य राहिली पाहिजे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मी आपलेच मानतो. कोणीही बुद्धिभेद करण्याचे काम करू नये, असा टोला माजी आमदार राजन तेली यांचे नाव न घेता राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. यावेळी त्यांनी भाजपचा एक जरी कार्यकर्ता फोडला असा आरोप सिद्ध झाल्यास पक्षाचा राजीनामा देईन, असे आव्हान भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले.मंत्री केसरकर यांनी सावंतवाडीत बुधवारी विविध विषयांवर आपली भूमिका आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. ते म्हणाले, मी मोठ्या प्रमाणात निधी आणत आहे. त्यांची कामेही सुरू आहेत. मात्र, काही जण श्रेयाचे राजकारण करीत आहेत. गृहखाते माझ्याकडे असताना काहीजण येथील मशिदीच्या वाढीव बांधकामाचे काम आपणच केल्याचे श्रेय घेत आहेत. हे योग्य नाही. जिल्ह्यात कधी नाही एवढा निधी आला आहे.

पाणीटंचाईची कामे राहिली असतील, पण पुढील वर्षात एकाही गावात पाणीटंचाई राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे ते म्हणाले. आमदार नीतेश राणे यांनी दिलेली गस्तीनौका स्वीकारायची की नाही ते प्रशासन ठरवेल; पण कोकणात पोलीस विभागाला अद्ययावत अशा गस्तीनौका मिळणार आहेत. माझ्यावर अनेक वेळा टीका होत असते. यातून मी शिकण्याचा प्रयत्न करतो.शिवसेना-भाजपची युती अभेद्य राहणारनिवडणुकीत आम्ही छोटा भाऊ-मोठा भाऊ असे जरी म्हटले असले, तरी शिवसेना-भाजपची युती अभेद्य राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांनी निवडणुकीनंतरच्या पहिल्या भाषणात शिवसेनाप्रमुखांचा उल्लेख केला. त्यामुळे खालच्या पातळीवरही ही युती टिकली पाहिजे, असे मंत्री केसरकर म्हणाले.

मी कधीही भाजप कार्यकर्त्यांना फोडण्याचे काम केले नाही. उलट काही भाजपचे सरपंच शिवसेनेमध्ये येण्यास इच्छुक होते. त्यांना युतीचा धर्म म्हणून घेतले नाही. असे असताना माझ्या विरोधात बुद्धिभेद का, असा सवाल करीत जर मी भाजपच्या एकाही कार्यकर्त्याला फोडल्याचे सिध्द झाल्यास पक्षाचा राजीनामा देईन, असेही आव्हान भाजपला दिले आहे.आंबोलीत पर्यटन पोलीस ठाणेआंबोलीला स्वंतत्र पर्यटन पोलीस ठाणे निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी निधीची तरतूद केली जाईल. सिंधुदुर्ग पोलिसांकडून प्रस्ताव मागविण्यात आला आहे. त्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी लवकरच दिली जाणार आहे, अशी माहिती यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी दिली. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग