शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

भात उत्पादनाची सरासरी हेक्टरी १00 क्विंटलपर्यंत नेण्याचा प्रयत्न : दीपक केसरकर

By admin | Updated: July 2, 2017 17:01 IST

कृषि दिन साजरा : बॉयोगॅस प्रचार प्रसिध्दीसाठी घडीपत्रिकेचे प्रकाशन

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. 0२ : भात लागवडीच्या सरासरी उत्पादनामध्ये राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा सर्वप्रथम असून काही शेतकऱ्यांनी १३४ क्विंटलपर्यंत भात उत्पादन घेतले आहेत. मात्र अजूनही जिल्ह्यात सरासरी ३२ क्विंटल एवढेच भात उत्पादन घेतले जाते. ही भात उत्पादनाची सरासरी १0 क्विंटलवर नेवू शकलो तर आपण खऱ्या अर्थाने क्रांती घडवू शकतो असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले.जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, कृषि विभाग महाराष्ट्र शासन व डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि दिन व शेतकरी मेळावा माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने उद्यान विद्या महाविद्यालय, मुळदे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा अधिक्षक कृषि विकास अधिकारी शिवाजीराव शेळके, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, गट विकास अधिकारी विजय चव्हाण, कृषि विकास अधिकारी एस. एम. म्हेत्रे, कुडाळ पंचायत समितीचे सभापती राजन जाधव, कुडाळ पंचायत समितीचे उपसभापती श्रेया परब, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उद्यानविद्या महाविद्यालयातीचे प्राचार्य व कर्मचारी, शेतकरी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते बॉयोगॅस प्रचार प्रसिध्दीसाठी घडीपत्रिकेचे प्रकाशनही करण्यात आले. केसरकर म्हणाले की, शेतकरी आजही पारंपारिक पध्दतीने शेती करतात. या शेतकऱ्यांनी शेती विकासासाठी तयार करण्यात आलेल्या अद्यावत यंत्रणांचा वापर करणे गरजेचे आहे. या जिल्ह्याचे भात पीक हे प्रमुख पीक असून भात हे मुख्य अन्न आहे. अलीकडे एस. आर. आय पध्दत विकसित झाली असून यामुळे कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेता येत आहे. याचा वापर शेतक-यांनी करावा. त्यासाठी त्यांना आवश्यक उपकरणे आपण चांदा ते बांदा योजनेखाली देण्याचे नियोजन केले आहे. एस.आर. आय भात लागवडीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी कितीही कोटी रुपये लागले तरी अनुदानाच्या रुपाने शेतक-यांना याचा लाभ मिळणार असल्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी दिले. जेणेकरुन शेतक-यांचे शेतीचे उत्पन्न वाढविण्यात मदत होईल.कोकम, जांभूळ आणि करवंदाची झाडे लावण्?यात यावी. नारळापासून निरा उत्पादन करण्यामध्ये खूप फायदा आहे. तरी शेतकऱ्यांनी निरा उत्पादन करण्यास पुढाकार घेतला पाहिजे. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजना समजून घेवून या योजनांचा लाभ घ्यावा, असे पालकमंत्री केसरकर म्हणाले. कुडाळ पंचायत समितीच्या वतीने २0१६-१७ खरीप हंगामात घेण्यात आलेल्या भात पीक उत्पादन स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळालेल्या शेतकरी सुषमा सावंत, सुरेश खरजुवेकर, अकुश परब यांचा शाल श्रीफळ व प्रशस्ती पत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच बॉयोगॅस निर्मिती मध्ये उल्लेखनीय काम केलेल्या कुडाळ तालुक्यातील ग्रामसेवकांचे सत्कार यावेळी करण्यात आले.