शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"चांगलं घडायचं होतं म्हणून वाईट घडलं"; छत्रपतींचा पुतळा कोसळ्यावर मंत्री केसरकर काय बोलून गेले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 12:28 IST

Deepak Kesarkar : मंत्री दीपक केसरकर यांनी आता त्याचठिकाणी १०० फुटांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी केली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapses:  सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी अचानक कोसळला. नौदल निमित्ताने वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ फुटी पुतळ्याचे अनावरण केलं होतं. मात्र वर्ष पूर्ण होण्याआधीच हा पुतळा कोसलळ्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिवप्रेमींसह विरोधकांनी यावरुन सरकारला धारेवर धरलं आहे. मात्र आता मंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेबाबत केलेल्या विधानाची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.  चांगलं घडायचं होतं म्हणून वाईट घडलं असं मला वाटतं असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानावरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या २८ फुटी पुतळ्याचे लोकार्पण केले होते. मात्र आता हा पुतळा सोमवारी कोसळला. हा पुतळा कोसळ्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.  शालेय शिक्षण मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी मंगळवारी भेट दिली. यावेळी केसरकर यांनी त्याचठिकाणी १०० फूट उंचीच्या पुतळ्याची उभारणी करावी अशी मागणी केली आहे.

"पुतळा कोसळणे हे दुर्दैवी आहेच. या पुतळ्याची उंची २८ फूट होती. मात्र येथील लोकांनी १०० फुटांचा पुतळा असावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. जर १०० फुटांचा पुतळा याठिकाणी उभा केल्यास ती सर्वांसाठीच अभिमानाची बाब असेल. मी राजकोट किल्ल्याचा दौरा करून पाहणी करणार आहे,” असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं.

शिवप्रेमींकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत असल्याचा प्रश्न दीपक केसरकर यांना विचारण्यात आला होत. त्यावर बोलताना दीपक केसरकर यांनी हे विधान केलं. "सध्या मला वाटतं हा एक अपघात आहे. त्यामुळे लोकांनी त्याचप्रकारे ते घ्याव. असं असेल की वाईटातून चांगलं घडायचं असेल. त्यामुळे हा अपघात घडला असेल. काही सांगता येत नाही. अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे कारवाई करेल. पण कारवाई केल्यामळे भावना भरुन येत नाही, असं दीपक केसरकर म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले पुतळा कोसळण्याचे कारण

"पुतळ्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आणि य कार्यक्रमाला आम्हीसुद्धा उपस्थित होतो. छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. हा पुतळा नौदलाने उभारला होता. त्याची संपूर्ण रचना नौदलाने तयार केली होती. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितले की, ४५ किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता. त्यामध्ये पुतळ्याचे नुकसान झालं. उद्याच तिथे नौदलाचे अधिकारी येणार आहेत. पुन्हा तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दिमाखात उभा करण्याचे काम आम्ही करु," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्गShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज