शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डी.एड., बी.एड. धारकांचे साखळी उपोषण, सिंधुदुर्ग-रत्नागिरी संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 16:40 IST

आगामी काळात होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, शिक्षक भरतीत गुण वाढवून देणाऱ्या रॅकेटवर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा डी.एड.,बी.एड. धारक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसाचे साखळी उपोषण सुरु केले आहे.

ठळक मुद्देडी.एड., बी.एड. धारकांचे साखळी उपोषणसिंधुदुर्ग-रत्नागिरी संघटनेचे आंदोलन  शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना ७0 टक्के आरक्षण देण्याची प्रमुख मागणी

सिंधुुदुर्गनगरी : आगामी काळात होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, शिक्षक भरतीत गुण वाढवून देणाऱ्या रॅकेटवर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा डी.एड.,बी.एड. धारक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसाचे साखळी उपोषण सुरु केले आहे.सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा डी.एड., बी.एड. धारक संघटनेचे अध्यक्ष भिवसेन मसुरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील डीएड, बीएडधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे.

यावेळी संघटनेच्या उपाध्यक्षा भाग्यश्री रेवडेकर, लवू खरवत, भाग्यश्री नर, गणपत दांडी यांच्यासह शेकडो डीएड, बीएड धारक उपस्थित होते. सिंधुदुर्ग-रत्नागिरी हे कोकणातील अत्यंत दुर्गम भागातील जिल्हे आहेत. येथील तरुण तरुणींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, जमिनी विकून आपले डीएड, बीएड शिक्षण पूर्ण केले आहे. परंतु, या सर्वांना आज अन्य रोजगारावर आपले पोट भरावे लागत आहे.

शासनाने गेली आठ वर्षे शिक्षक भरती प्रक्रिया राबविली नसल्याने राज्यातील लाखो डी.एड, बीएड धारक बेरोजगार आहेत. केवळ नावालाच शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) राबविली जात असल्याचा आरोपही या संघटनेने केला आहे.

पुढे कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळेच नाराज झालेल्या जिल्ह्यातील शेकडो उमेदवारांनी आक्रमक भूमिका घेत एप्रिल महिन्यात भव्य मोर्चा काढला होता. तरीही शासनाने याकडे लक्ष दिलेले नाही. म्हणूनच आंदोलनाची पुढील दिशा म्हणून या डीएड, बीएड धारकांनी सोमवार १४ ते १६ मे या तीन दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यास सुरुवात केली आहे.त्याचप्रमाणे शिक्षक भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण न दिल्यास परजिल्ह्यातील एकाही उमेदवारला जिल्ह्यात रूजू करून घेतले जाणार नसल्याचा इशारा या संघटनेने दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या डीएड, बीएड धारकांनी यावेळी विविध गीते व भजने सादर केली. या गीत गायनामधूनही शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

...या आहेत प्रमुख मागण्याआंतरजिल्हा बदल्यांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी व येथील बेरोजगारी कमी करण्यासाठी स्थानिक डीएड बीएड धारकांना शिक्षक भरतीत प्राधान्य द्यावे, सिंधुदुर्ग व रत्नागिरी हे जिल्हे डोंगराळ भागात असल्याने या जिल्ह्यात डोंगरी भाग निकषातून आरक्षण मिळावे, सन २०१० सारखे विदर्भ-मराठवाड्यामधील शिक्षकांचे पुनर्वसन कोकणात करू नये, शिक्षक भरतीत गुण वाढवून देणाऱ्या रॅकेटवर कारवाई करावी

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक