शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्यदुष्काळ घोषित करून आर्थिक सहकार्य करा, मच्छीमार संघटनेची मागणी

By सुधीर राणे | Updated: November 25, 2022 15:42 IST

जिल्हा श्रमजीवी रापण मच्छीमार संघांच्यावतीने आमदार नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी

कणकवली: हवामानात सातत्याने होत असलेले बदल, पर्ससीनधारकांचा धुमाकुळ यासह अनेक समस्येमुळे मासेमारी व्यवसाय अडचणीत आला आहे. येत्या अधिवेशनात सरकारने गांभीर्याने मच्छीमारांच्या समस्यांचे निराकरण करुन ‘मत्स्यदुष्काळ' घोषित करावा. तसेच आर्थिक सहकार्य घोषित करावे, अशी मागणी जिल्हा श्रमजीवी रापण मच्छीमार संघ यांच्यावतीने आमदार नितेश राणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.या निवेदनात म्हटले आहे की, सन २०१६ ते आज मितीस तालुक्यातील सगळे रापण संघ 'मत्स्यदुष्काळाच्या' खाईत लोटले गेले आहेत. रापण व्यवसायावर अवलंबित सदस्यांच्या कुटुंबियांची उपासमार सुरु आहे. मागील सरकारने आपत्कालीनदृष्टीने थोडीफार मदत केली. पण ३ वर्षात किनारपट्टीवर खांडवी मासळी येत नाही. हवामानात सातत्याने होत असलेले बदल, पर्ससीनधारकांचा धुमाकुळ, परराज्यातील नौकांकडून होत असलेली मासळीची लुट व त्यातच हायस्पीड परप्रांतीय यामुळे मासेमारीच्या ऐन हंगामात थव्यांची मासळी येणे किनारपट्टीवर दुरापास्त झाले आहे.परिणामी रापण व्यवसाय डबघाईस आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांनाही 'आत्महत्ये'चा पर्याय शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रशासनाने सद्यस्थिती माहिती घेऊन अहवाल बनवावा तसेच 'मत्स्यदुष्काळजन्य' स्थितीचा अहवाल शासनाकडे सादर करावा अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFishermanमच्छीमार