शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी अर्बन विलिनीकरणचा निर्णय येत्या शनिवारच्या सभेत, सभासदांच्या भूमिकेकडे लक्ष 

By अनंत खं.जाधव | Updated: June 24, 2024 16:27 IST

टीजेएस बँकेत होणार विलीनीकरण 

सावंतवाडी : सावंतवाडी अर्बन बँकेच्या विलिनीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाणे येथील टीजेएस् सहकारी बँकेत विलिनीकरण होणार असून यासंदर्भात आता सावंतवाडी अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा २९ जूनला होणार आहे. या सभेत बँकेच्या विलिनीकरणाचा निर्णय घेऊन प्रस्ताव मंजुरीसाठी रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात येणार आहे.यासंदर्भात टीजेएस बँकेची सर्वसाधारण सभा २१ जूनला पार पडली  त्यात सावंतवाडी अर्बन बँक विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला तर  २९ जूनला सावंतवाडी अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेत टीजेएस बँकेत सावंतवाडी अर्बन बँक विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात येणार आहे. सावंतवाडी अर्बन बँक सिंधुदुर्गातील सर्वात जुनी सहकारी संस्था आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा आहे. या संस्थेचे जिल्हाभरात बारा हजारांहून अधिक सभासद आहेत. बँकेवर आरबीआयने आठ महिन्यांपूर्वी निर्बंध लादले. बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आल्यानंतर बँक अडचणीत आली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाने सभासदांकडून तीन कोटीचे भाग भांडवल जमा करण्याचा निर्धार केला. त्यानुसार दीड कोटीहून अधिक भाग भांडवल जमा झाले. अद्याप बँकेवरील निर्बंध हटलेले नाहीत. परंतु अर्बन बँक विलीनीकरणाच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. यापूर्वी अर्बन बँकांना सहकारी बँकेत विलिनीकरणाचा प्रस्ताव होता परंतु यावर शिक्कामोर्तब झाले नाही.दरम्यानच्या काळात 'सावंतवाडी अर्बन बँक अन्य बँकेत विलीनीकरण करण्याबाबत चर्चा होत्या. या चर्चा होत असताना आता सावंतवाडी अर्बन बँक ठाणे येथील टीजेएस सहकारी बँकेत विलिनीकरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, टीजेएस सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा पडली आहे. तर २९ जूनच्या सावंतवाडी अर्बन बँकेच्या सभेत टीजेएस बँकेत सावंतवाडी अर्बन बँक विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात येणार आहे. या सभेत सभासद काय भूमिका घेतात हे महत्वाचे ठरणार आहे. ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गbankबँकSawantwadiसावंतवाडी