शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शहर विकास आराखड्यातील हद्द निश्चिती करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 16:44 IST

KankavliNews Sindhudurg- कणकवली शहराचा विस्तार दिवसेंदिवस होत असून, विकास आराखड्यातील हद्द निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कणकवली नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसेच त्या संदर्भातील हरकती नागरिकांकडून मागविण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.

ठळक मुद्देशहर विकास आराखड्यातील हद्द निश्चिती करण्याचा निर्णय कणकवली नगर पंचायत सभा : नागरिकांकडून हरकती मागविणार

कणकवली : कणकवली शहराचा विस्तार दिवसेंदिवस होत असून, विकास आराखड्यातील हद्द निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कणकवली नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसेच त्या संदर्भातील हरकती नागरिकांकडून मागविण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ऑनलाईन सभेमध्ये कणकवली शहर विकास आराखड्यामधील आरक्षण व नवीन रस्ते विकसित करण्याकरिता एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली अन्वये हस्तांतरणीय हक्क नगर पंचायत क्षेत्रासाठी लागू करण्याबाबतचा निर्णय प्रामुख्याने घेण्यात आला.या सभेला उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, सत्ताधारी गटनेते संजय कामतेकर, नगरसेविका मेघा गांगण, कविता राणे, सुप्रिया नलावडे, मेघा सावंत, माही परुळेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, बाबू गायकवाड, विराज भोसले, अबिद नाईक आदी उपस्थित होते.गार्बेज डेपो येथे ओल्या व सुक्या कचऱ्यावरील प्रक्रियेबाबत अनुषंगिक कामे करण्यासाठी अतिरिक्त जमीन आवश्यक आहे. त्यामुळे तेथील सर्व्हे नंबर ७९ अ-१४ ही जमीन मालकाकडून वाटाघाटीने खरेदी करण्याबाबतची चर्चाही यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर तेथील ६७ गुंठे जागा गार्बेज डेपोच्या विकासासाठी घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.कणकवली शहरातील नवीन बांधकाम मुदतवाढीसाठी शासकीय शुल्क आकारणी संदर्भात चर्चा करण्यात आली. शहरात बांधकामासाठी परवानगी घेऊन एक वर्षानंतरही संबंधित जागेवर बांधकाम झालेले नाही, अशा जागांचा शोध घेऊन संबंधितांना मुदतवाढ देऊन इमारतींसाठी एक हजार रुपये आणि घरांसाठी पाचशे रुपये शुल्क आकारणी करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. त्याचबरोबर सीटी को-ऑर्डिनेटर मुदतवाढ देण्यासंदर्भातही चर्चा झाली. त्यानंतर मुदतवाढ देण्यात आली.यावेळी टेंबवाडी रस्ता, सुकी बिल्डिंग रस्ता करण्याची मागणी नगरसेविका कविता राणे यांनी केली. शिवाजीनगर येथील पथदीपांचे काम करण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष नलावडे यांनी शिवाजीनगर पथदीपाला मंजुरी मिळाली असून, निधी उपलब्ध होताच तत्काळ काम करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.शहर विकासाच्या विविध विषयांवर चर्चाशहरातील मसुरकर किनई रस्ता पूर्ण करून त्याचे आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण केल्याबद्दल नगरसेवक अभिजीत मुसळे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला नगरसेवक संजय कामतेकर यांनी अनुमोदन दिले. शहर विकासाच्या विविध विषयांवर या सभेत चर्चा करण्यात आली.

टॅग्स :KankavliकणकवलीMuncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग