शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हा बागायतदार संघ स्थापन करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 15:07 IST

Banking Sector Sindhudurg -शेतकऱ्यांच्या काजू बी सह फळपिकांना चांगला दर मिळवून देण्यासाठी गोवा बागायतदार सहकारी संघाच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्हा बागायतदार सहकारी संघ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर गतवर्षीप्रमाणे यावर्षीही काजू बीच्या खरेदीसाठी सोसायट्यांना जिल्हा बँक तर्फे ९ टक्के व्याज दराने कॅश क्रेडीट कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा बागायतदार संघ स्थापन करण्याचा निर्णय काजू बी खरेदीसाठी सोसायट्यांना कॅश क्रेडीट: सतीश सावंत

सिंधुदुर्ग : शेतकऱ्यांच्या काजू बी सह फळपिकांना चांगला दर मिळवून देण्यासाठी गोवा बागायतदार सहकारी संघाच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्हा बागायतदार सहकारी संघ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर गतवर्षीप्रमाणे यावर्षीही काजू बीच्या खरेदीसाठी सोसायट्यांना जिल्हा बँक तर्फे ९ टक्के व्याज दराने कॅश क्रेडीट कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.सिंधुदुर्ग जिल्हा काजू समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीला जिल्हाभरातून काजू बागायतदार शेतकरी उपस्थित होते. या बैठकीत बागायतदार शेतकऱ्यांच्या काजू बी पिकासह अन्य फळपिकांना चांगला दर मिळवून देण्यासंदर्भात चर्चा झाली. सावंत यांनी याबाबतची माहिती यावेळी समन्वय समितीचे जिल्हा समन्वयक संदीप राणे उपस्थित होते.यावेळी सतीश सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागात काजू बी चे दर वेगवेगळे आहेत. काजू बी चा दर १०० रुपये प्रति किलो एवढा खाली घसरला आहे. त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यांच्या काजू बी ला चांगला दर मिळावा यासाठी समन्वय समितीचे प्रयत्न आहेत. आजच्या बैठकीत गोव्याला ज्याप्रमाणे गोवा बागायतदार शेतकरी सहकारी संघ कार्यरत आहे त्याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्हा बागायतदार शेतकरी संघ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी येत्या १९ एप्रिल रोजी गोवा बागायतदार शेतकरी संघाचे कामकाज पाहण्यासाठी व त्यांचा अभ्यास करण्यासाठी समन्वय समितीचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.दोडामार्ग, बांदा या भागातील शेतकऱ्यांनी काजूबी १२५ रुपये प्रति किलो दराने विक्री करावी. त्यापेक्षा कमी दराने विकू नये. तसेच अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांनी ११५ रुपये प्रति किलो दराने काजू बी ची विक्री करावी त्यापेक्षा कमी दराने विकू नये. असे आवाहन केले. आपल्याकडील काजू बी ची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी सोसायटयाना जिल्हा बँकेतर्फे गतवर्षीपेक्षा अर्धा टक्का कमी दराने नऊ टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. त्यांनी ११५ रुपये प्रति किलो या दराने शेतकऱ्यांची काजूबी खरेदी करावी. गेल्या वर्षी हा प्रयोग यशस्वी झाला होता .

टॅग्स :Satish Sawantसतीश सावंतBanking Sectorबँकिंग क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग