शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चांदा ते बांदा योजनेबाबत सविस्तर आढाव्यानंतर निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 18:56 IST

सिंधुदुर्ग व चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी २०१६ ते २०२० पर्यंत चार वर्ष राबविण्यात आलेल्या चांदा ते बांदा योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर आढाव्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत दिली. या योजनेत खर्च न झालेला निधी शासनाने परत मागविला नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देचांदा ते बांदा योजनेबाबत सविस्तर आढाव्यानंतर निर्णयउपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबई/सिंधुदुर्ग  : सिंधुदुर्ग व चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी २०१६ ते २०२० पर्यंत चार वर्ष राबविण्यात आलेल्या चांदा ते बांदा योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर आढाव्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत दिली. या योजनेत खर्च न झालेला निधी शासनाने परत मागविला नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, निरंजन डावखरे, नागोराव गाणार, प्रसाद लाड, परिणय फुके यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मुद्दा मांडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात निधी उपलब्ध असतानाही, या योजनेतून एकही प्रकल्प राबविला गेला नाही. तर ९ जानेवारी २०२० मध्ये निधी अखर्चित राहिल्यामुळे तो शासनाला समर्पित केला जात आहे का, याबाबत राज्य सरकारला प्रश्न विचारण्यात आला होता. योजना बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये ४९ कोटी, २०१७-१८ मध्ये ६७ कोटी, २०१८-१९ मध्ये ७२ कोटी ५७ लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरीत करण्यात आले. त्यानुसार कृषी व मत्स्यव्यवसाय क्षेत्रात राबविलेल्या योजनेचा ३ हजार ४५८ लाभार्थ्यांनी लाभ घेतला होता.

या योजनेला ३१ मार्च २०२० पर्यंत मान्यता देण्यात आली होती. गेल्या चार वर्षांत झालेल्या कामाची सद्यस्थिती व झालेला खर्च आदींबाबत सविस्तर आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अखर्चित निधी शासनाला परत पाठविण्याबाबत कोणत्याही सुचना देण्यात आलेल्या नाहीत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.सिंधुदुर्गाच्या विकासावर विपरित परिणाम : डावखरेचांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक विकासात्मक कामे झालेले आहे अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. ही योजना बंद केल्यास सिंधुदुर्गामधील विकासकामांवर विपरित परिणाम होईल, अशी प्रतिक्रिया आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Niranjan Davkhareनिरंजन डावखरेsindhudurgसिंधुदुर्गVidhan Parishadविधान परिषद