शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कलमठ येथील लेप्टो सदृश रुग्णाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 23:18 IST

कणकवली: कलमठ बाजारपेठ येथील सेंटरिंगचे काम करणाऱ्या रमेश हरिसिंग जाधव (41) याचा लेप्टो सदृश तापाने खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.

कणकवली: कलमठ बाजारपेठ येथील सेंटरिंगचे काम करणाऱ्या रमेश हरिसिंग जाधव (41) याचा लेप्टो सदृश तापाने खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. कलमठ बाजारपेठ येथे भाड्याने राहत असलेल्या रमेश जाधव याला तीन दिवसांपूर्वी ताप येत होता.तसेच त्याला श्वसनाचा त्रास सुरू झाला होता. 5 नोव्हेंबर रोजी ताप येत असल्याने त्याने खासगी दवाखान्यात किरकोळ उपचार घेतले होते. मात्र , ताप कमी न झाल्याने 8 नोव्हेंबर रोजी सकाळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले होते. तेथून त्याला अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्या रक्ताची चाचणी लेप्टो पॉझिटिव्ह आली होती. तसेच त्याच्या शरीरातील प्लेटलेटची संख्या 33000 इतकी झाली होती.त्याला बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . त्याच्या प्लेटलेटची संख्या 13000 पर्यन्त कमी झाली होती. गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास रमेश जाधव याची उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात पत्नी ,तिन मुले असा परिवार आहे. दरम्यान, रमेश जाधव याचा लेप्टो सदृश तापाने मृत्यु झाल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने कलमठ बाजारपेठ परिसरात सर्व्हे केला. तसेच किरकोळ ताप येणाऱ्या रुग्णांना औषध दिल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.