शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, वनविभागाने केले अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 10:37 IST

रेल्वेची धडक बसून शनिवारी सायंकाळी आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना कोकिसरे बांधवाडी येथील विठ्ठल मंदिरानजीक घडली. गुरुवारी सकाळी कोकिसरे नारकरवाडीनजीक बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ तिसऱ्या दिवशी दुसरी घटना घडली आहे. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा वनविभागाने बिबट्यावर अंत्यसंस्कार केले.

ठळक मुद्देरेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यूवनविभागाने केले अंत्यसंस्कार

वैभववाडी : रेल्वेची धडक बसून शनिवारी सायंकाळी आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना कोकिसरे बांधवाडी येथील विठ्ठल मंदिरानजीक घडली. गुरुवारी सकाळी कोकिसरे नारकरवाडीनजीक बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ तिसऱ्या दिवशी दुसरी घटना घडली आहे. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा वनविभागाने बिबट्यावर अंत्यसंस्कार केले.कोकिसरे बांधवाडी येथील काही ग्रामस्थांना शनिवारी दुपारनंतर रेल्वे ट्रॅकपासून काहीसे लांब असलेल्या विठ्ठल मंदिरानजीक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे ग्रामस्थांनी ही माहिती वनविभागाला दिली. ही माहिती मिळताच वनक्षेत्रपाल एस. बी. सोनवडेकर, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक पी. डी. पाटील, वनमजूर चंद्रकांत मराठे हे घटनास्थळी पोहोचले.

मृतावस्थेत आढळलेली ती बिबट्याची मादी होती. तिला गंभीर दुखापत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बिबट्याच्या मादीला रेल्वेची धडक बसली असावी असा वनविभागाचा अंदाज आहे. त्यामुळेच तिचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त केली. मादी बिबट्याचे वय अंदाजे पाच वर्षे होते. मृत बिबट्यावर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.बिबट्याची मृत मादी मृत बछड्याची आई?कोकिसरे परिसरात एक मादी बिबट्या आणि दोन बछड्यांचा वावर होता अशी माहिती वनविभागाला होती. त्यापैकी एका बछड्याचा दोन दिवसांपूर्वी रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला होता. तर शनिवारी मृतावस्थेत आढळलेली मादी ही त्या बछड्याची आई असण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली.

टॅग्स :leopardबिबट्याsindhudurgसिंधुदुर्ग