शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आरोसमध्ये मृत माकड आढळले, वन, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 16:04 IST

आरोस-वरचीआळी येथे सुमारे चार वर्षांचा मृत माकड आढळल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. पूर्वीच्या घटनेवेळी वनविभागास कळवूनही न आल्याने याची खबर आरोग्य विभागास देण्यात आली. मात्र, वनविभागचा कोणताही अधिकारी वा कर्मचारी न आल्याने ग्रामस्थांनीच माकडावर अंतिम संस्कार केले. ग्रामस्थांच्या आरोग्याचे सोयरसुतक नसलेल्या अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

ठळक मुद्देआरोसमध्ये मृत माकड आढळलेवन, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

सावंतवाडी : आरोस-वरचीआळी येथे सुमारे चार वर्षांचा मृत माकड आढळल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. पूर्वीच्या घटनेवेळी वनविभागास कळवूनही न आल्याने याची खबर आरोग्य विभागास देण्यात आली. मात्र, वनविभागचा कोणताही अधिकारी वा कर्मचारी न आल्याने ग्रामस्थांनीच माकडावर अंतिम संस्कार केले. ग्रामस्थांच्या आरोग्याचे सोयरसुतक नसलेल्या अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सतर्क राहण्याची आवश्यकता असतानादेखील अशा घटनांकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. आरोस-वरचीआळी येथे शेतकरी महेश आरोसकर यांच्या काजू बागेत मृत माकड दिसून आले. गावात पूर्वी तीन माकड मृत सापडले होते. त्यावेळी वारंवार वनविभागास कळवूनही दखल न घेतल्याने आजच्या घटनेची खबर त्यांनी आरोग्य विभागास दिली. परंतु निद्रावस्थेत तसेच बेजबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांनी यावेळी घटनास्थळी येणे टाळले व ग्रामस्थांनाच त्या मृत माकडाची विल्हेवाट लावण्यास सांगितले.त्यामुळे एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट करण्यात आली असली तरी ग्रामीण भागात मात्र त्याकडे कानाडोळा केला जात असल्याचे महेश आरोसकर यांनी सांगितले. शेवटी ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी देऊ परब, गोपाळ नाईक यांनी मृत माकडाची विल्हेवाट लावली.दरम्यान, वनविभागाशी संपर्क साधला असता मृत माकडांची विल्हेवाट लावण्याचे सर्व अधिकार ग्रामपंचायतीला दिले आहेत. तरी सुद्धा आम्ही जवळपास असल्यास घटनास्थळी जात असल्याचे आजगाव वनपाल धुरी यांनी सांगितले. तसेच आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :MonkeyमाकडHealthआरोग्यsindhudurgसिंधुदुर्ग