शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे भातशेतीचे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 16:41 IST

सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे भातशेतीच्या नुकसानीची तत्काळ पाहणी करून तसेच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी तहसीलदार मारुती कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे पावसामुळे भातशेतीचे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावीनंदकुमार घाटे यांची निवेदनाद्वारे मागणी

देवगड : सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे भातशेतीच्या नुकसानीची तत्काळ पाहणी करून तसेच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी तहसीलदार मारुती कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनामध्ये म्हटले आहे की, यावर्षी पावसाळी हंगाम चांगला होता व भातशेतीचे उत्पादनही अपेक्षितपणे चांगले आले होते. भातशेती तयार झाल्यानंतर सतत आठवडाभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक शेतात पडून त्याचे नुकसान झाले आहे.कोरोना संक्रमणामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. यावर्षी ग्रामीण भागातील भाजीपाला उत्पादनात प्रचंड घट झाल्याने ग्रामीण शेतकरी भातशेतीबरोबर भाजीपाला उत्पादनातही कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.त्यामुळे कृषी विभागामार्फत भातशेती नुकसानीची पाहणी व तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई त्वरित मिळण्याकरीता प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठीचे निवेदन देताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्यासह शरद शिंंदे, नागेश आचरेकर, उदय रूमडे, बाबू वाळके, कृष्णा परब आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी