शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ओटवणेत गव्यांकडून शेती, बागायतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 18:17 IST

forest department sindhudurg -ओटवणे कापईवाडी परिसरात पुन्हा एकदा गव्यांचा दिवसरात्र संचार सुरू असल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून गव्यांची दिवसा व रात्री बागायती शेतीत तसेच वस्तीत घुसून दहशत सुरू आहे.

ठळक मुद्देओटवणेत गव्यांकडून शेती, बागायतीचे नुकसान ग्रामस्थांचा जीव धोक्यात : कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी

बांदा : ओटवणे कापईवाडी परिसरात पुन्हा एकदा गव्यांचा दिवसरात्र संचार सुरू असल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून गव्यांची दिवसा व रात्री बागायती शेतीत तसेच वस्तीत घुसून दहशत सुरू आहे. दिवसाही घराबाहेर पडणे जीवावर बेतणार आहे. नुकसानीबरोबर जीवही धोक्यात आला असून वन विभाग मात्र पंचनामा करण्यापलीकडे ठोस उपाययोजना करीत नाही. आम्हांला कागदोपत्री नुकसानीचे पंचमाने नको. तर गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे.मंगळवारी रात्री गव्यांच्या कळपाने ओटवणे कापईवाडी येथील संगीता उपरकर यांच्या शेती बागायतीत धुडगूस घातला. यात चवळी, मका, मिरची, वाल व इतर उन्हाळी पिकांची नासधूस केली आहे. यात संगीता उपरकर यांचे सुमारे ५० ते ६० हजारांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, रूपाली पानगळे, बापू कोठावळे, रमेश वरेकर, रवींद्र कुडाळकर, गंगाराम कोठावळे, अंकुश नाईक यांच्या शेतीचीही गव्यांच्या कळपाने मोठी नुकसानी केलेली आहे.गव्यांचे कळप हे रात्रंदिवस भरवस्तीत वावरत असून वन विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत निद्रिस्त आहे. पंचनामा करण्यापलीकडे वन विभाग ठोस उपाययोजना करीत नाही, असे सांगत शेती बागायती स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी करावी की गव्यांचे पोट भरण्यासाठी करावी? असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.जीव जाण्याची वाट पाहताय काय ?कर्ज काढून शेती बागायती केली अन् गव्यांच्या उपद्रवामुळे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. २००८ साली याच वाडीमधील हत्तीच्या हल्ल्यात केशव उपरकर यांना जीव गमवावा लागला होता. आता गव्याच्या हल्ल्यात कोणाचा जीव जाणार? त्याच्या प्रतीक्षेत वन विभाग आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग