शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महिलेस छेडणाऱ्या मद्यधुंद परप्रांतीयास चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 11:18 IST

मद्यधुंद अवस्थेत महिलेची छेड काढून महाराष्ट्रीयन लोकांना शिवीगाळ करणाऱ्या एका परप्रांतीयास स्थानिकांनी पकडून बेदम मारहाण केली. यावेळी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांशीही त्याने हुज्जत घातली. बंडो चरण महतो असे त्याचे नाव असून तो अरुणा प्रकल्पावर कामाला आहे. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. 

ठळक मुद्देमहिलेस छेडणाऱ्या मद्यधुंद परप्रांतीयास चोपपोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

वैभववाडी : मद्यधुंद अवस्थेत महिलेची छेड काढून महाराष्ट्रीयन लोकांना शिवीगाळ करणाऱ्या एका परप्रांतीयास स्थानिकांनी पकडून बेदम मारहाण केली. यावेळी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांशीही त्याने हुज्जत घातली. बंडो चरण महतो असे त्याचे नाव असून तो अरुणा प्रकल्पावर कामाला आहे. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. एका बँकेत कामानिमित्त आलेला महतो दुपारी तर्रर्र होऊन बाजारपेठेत फिरत होता. बाजारपेठेतील एक महिला आणि तरुणी संभाजी चौकातून जात असताना महतो याने त्यांना रस्त्यात अडवून महिलेच्या हातातील डबा हिसकावूनघेतला.यावेळी त्याच्या हातातून महिलेने डबा काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने तिला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यामुळे महिलेने पतीला बोलावून घेतले. तिच्या पतीने त्या परप्रांतीयाच्या हातातील डबा काढून घेताच त्याने महाराष्ट्रीयन लोकांचा उल्लेख करीत शिव्या देण्यास सुरुवात केली.त्यामुळे तेथे जमलेल्या स्थानिकांनी परप्रांतीयास मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीनंतरही तो जोरजोरात शिवीगाळ करीत होता. त्यामुळे संतप्त जमावाने त्याला लाथाबुक्यानी मारले.या घटनेचे दृश्य सीसीटीव्हीद्वारे दिसताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या परप्रांतीयाला गाडीत कोंबण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पोलिसांशीही हुज्जत घातली. तरीही पोलिसांनी गाडीत कोंबून त्याला पोलीस ठाण्यात नेले.

महतो विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करुन पोलिसांनी त्याला धरणावरुन आलेल्या सहकाऱ्यांच्या ताब्यात दिले. दरम्यान या प्रकारामुळे बंडो चरण महतो यास कामावरुन काढून टाकण्याबाबत व्यवस्थापनाने पाऊल उचलले असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग