शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नाथ पै यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारणार : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 12:28 IST

वेंगुर्ला तालुक्यात बॅ. नाथ पै यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्या ठिकाणी त्यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ल्यात दिली.

ठळक मुद्देनाथ पै यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारणार : उदय सामंत पुस्तकाचे प्रकाशन : वेंगुर्ला येथे ५० व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यात बॅ. नाथ पै यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्या ठिकाणी त्यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ल्यात दिली.राजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय माजी खासदार, संसदपटू बॅ. नाथ पै यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित बॅ. नाथ पै या पुस्तकाचे प्रकाशन बॅ. नाथ पै यांचे शालेय शिक्षण झालेल्या वेंगुर्ला शाळा नं. १ येथे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले.यावेळी पुस्तकाच्या लेखिका व नाथ पै यांची नात अदिती पै, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, रुची राऊत, नाथ पै शिक्षण संस्था कुडाळचे चेअरमन उमेश गाळवणकर, बॅ. नाथ पै यांचे सहकारी बाबुकाका अवसरे, बॅ. नाथ पै यांचे चिरंजीव शैलेंद्र पै, साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, ॲड. देवदत्त परुळेकर आदी उपस्थित होते.आपल्या आजी-आजोबा, आत्या यांच्याकडून वेंगुर्ल्यातील नाथ पै यांच्या आठवणींच्या गोष्टी ऐकायला मिळत असत. त्यामुळे त्यांच्याबद्दलची उत्सुकता वाढली आणि हे पुस्तक लिहिण्यात आले. या पुस्तकात लिखाण हे पुष्पसेन सावंत, आना महाले, बाबुकाका अवसरे यांच्याकडून माहिती घेऊन केले असल्याचे अदिती पै यांनी सांगितले. सूत्रसंचालन सचिन वालावलकर यांनी केले तर आभार ॲड. देवदत्त परुळेकर यांनी मानले.स्मारकासाठी देणगी देणारनाथ पै यांनी संसदीय लोकशाहीला फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी आम्ही स्पर्धा करू शकत नाही. कोकण रेल्वेच्या निर्धाराला गती देण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे नाव चिपी विमानतळाला देण्यासाठी आम्ही आग्रही राहू, असे प्रतिपादन खासदार राऊत यांनी केले. तर आमदार केसरकर म्हणाले, सीमा प्रश्नावर भाषण करीत असतानाच त्यांचे निधन झाले. नाथ पै यांच्या ५० व्या स्मृतिदिन वर्षात सीमा प्रश्न सुटल्यास तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. वेंगुर्ला केंद्रशाळा नं. १ मध्ये त्यांचे स्मारक होण्यासाठी १० लाखांची देणगी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :literatureसाहित्यsindhudurgसिंधुदुर्ग