शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सागरी बंधाऱ्याची सीआरझेड परवाना प्रकरणे डावलली, शिवसैनिकांचे मुंबईत एम.सी.झेड.एम.ए.च्या कार्यालयासमोर आंदोलन

By सुधीर राणे | Updated: December 8, 2022 18:07 IST

पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

कणकवली: सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण येथे झालेल्या बैठकीच्या अजेंड्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेषतः मालवण तालुक्यातील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची सीआरझेड परवानगीची  प्रकरणे डावलण्यात आली आहेत. त्यामुळे काल, बुधवारी कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मुंबईतील नरिमन पॉईंट येथील सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयासमोर आंदोलन केले.यावेळी एम.सी.झेड.एम.ए.च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची सीआरझेड परवानगीची प्रकरणे पुढील बैठकीत समाविष्ट करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे वायरी, दांडी, सर्जेकोट, मसुरे खोत जुवा तळाशील, देवबाग, मेढा राजकोट, येथील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची प्रकरणे मंजूर झाली आहेत. मात्र, सीआरझेड परवानगीमुळे ही कामे थांबली आहेत. गेले काही महिने पाठपुरावा करून देखील कामांना मान्यता देण्यात आलेली नाही.

तसेच काल, बुधवारी झालेल्या बैठकीत देखील ती प्रकरणे अजेंड्यावर घेण्यात आलेली नाहीत. त्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पंढरी तावडे, संदेश कानडे, अनंत पाटकर, अमोल पाटकर, अक्षय देसाई, अजय रोहरा, विकास चिले आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना