शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ज्याच्या निधीवर टक्केवारी काढली त्याच्यावरच टिका, शिवसेना शिंदे गटाकडून गंभीर आरोप

By अनंत खं.जाधव | Updated: March 13, 2023 19:17 IST

सावंतवाडी : ज्यानी निधी आणला त्याच्याच निधीवर पैसे कमवले आणि आता त्याच्यावर आरोप करता म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. ...

सावंतवाडी : ज्यानी निधी आणला त्याच्याच निधीवर पैसे कमवले आणि आता त्याच्यावर आरोप करता म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. मंत्री दीपक केसरकर यांनी पक्षासाठी बेळगाव व आंबोलीतील मालमत्ता विकली यांचे साक्षीदार आम्ही आहोत. त्यामुळे ज्याचे आयुष्य टक्केवारी गेले त्यांनी केसरकरांवर बोलणे दुर्दैव असल्याची टिका शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख बबन राणे यांनी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ याच्यावर केली.

ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेत्या अनारोजीन लोबो, बाबू कुडतरकर, मंगलदास देसाई, गजानन नाटेकर, भारती मोरे आदी उपस्थित होते.राणे म्हणाले, राऊळ यांना मागच्या काळात सुगीचे दिवस होते. पण आता सत्ता नाही त्यामुळे त्याची अडचण झाली आहे. निधी नाही त्यामुळे टक्केवारी नाही म्हणून ते मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टिका करतात. पण ही टीका करताना त्यांनी विचार करावा की मागील काळात ज्यांनी निधी आणला त्यांच्यावरच आज तुम्ही टीका करत आहात. ज्यांनी राजकारणात पैसे कमावयाचे सोडून आपली मालमत्ता विकून पक्ष वाढवला यांचे आम्ही साक्षीदार असून बेळगाव व आंबोली येथील मालमत्ता त्यांनी विकल्याचेही ते म्हणाले. एकाच पदाला जे वर्षानुवर्ष चिकटून आहेत, जे दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी देत नाहीत, आपल्या वरिष्ठ नेतृत्वाला खुश करूनच ते एवढी वर्षे या पदावर असल्याचा आरोप ही राणे यांनी केला. अनारोजीन लोबो यांनी ही राऊळ याच्यावर सडकून टीका केली. जे भांड्याच्या घरात राहत होते त्यांनी अचानक सदनिका खरेदी केली यांचे गुपित काय असा सवाल करत केसरकर हे यांनी लोकहिताचे राजकारण केले असून टक्केवारीचे राजकारण केले नाही. खोके म्हणता त्याचा अर्थ काय आम्हाला आंब्याचे खोके माहीत आहेत त्यामुळे बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना जनता ओळखून असल्याचे लोबो म्हणाल्या.

अॅड निता सावंत-कविटकर यांनी पाच वर्षांत मंत्री केसरकर यांची मालमत्ता दुप्पट होण्यामागे रेडीरेकनरचा दर कारणीभूत असून मालमत्तेचे दर हे दरवर्षी वाढत जातात असे सांगितले. त्यामुळेच हा दर वाढला असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Shiv Senaशिवसेना