शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

काजू बियांवर बुरशीजन्य रोगाचे संकट! बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 13:25 IST

कोकणात मोठ्या प्रमाणात काजू, आंबा यांची लागवड केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा हंगाम लांबल्यामुळे पालवी व पर्यायाने मोहोर येण्याच्या प्रक्रियेस विलंब झाला

रजनीकांत कदमकुडाळ : सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी काजूवर काळे डाग दिसून येत आहेत. हे काळे डाग हे विशिष्ट प्रकारच्या  बुरशीजन्य रोगामुळे असल्याची माहिती बागायतदार देत आहेत. या बुरशीमुळे काजू पिकांवर परिणाम होणार असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.कोकणात मोठ्या प्रमाणात काजू, आंबा यांची लागवड केली जाते. या फळबागायतीवर मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. मात्र वर्षातुन एकवेळ फळे लागणाऱ्या या आंबा, काजू झाडासांठी बागायतदारांना वर्षभर मेहनत करावी लागते. तरी येथील फळ लागण्याची प्रक्रीया येथील वातावरणावर अवलंबून असते. तसेच बऱ्याच रोगांच्या प्रादुर्भावालाही येथील झाडांना सामोरे जावे लागते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा हंगाम लांबल्यामुळे पालवी व पर्यायाने मोहोर येण्याच्या प्रक्रियेस विलंब झाला. मोहोर फुटण्याच्या प्रारंभी डिसेंबर, जानेवारी महीन्यात पडलेल्या पावसामुळे मोहोरावर व छोट्या कणीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला.कृषी विभागाने वर्तवली होती शक्यता

  • तुडतुडे, फुलकिडी यांसह करपा, भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही कृषी विभागाच्यावतीने वर्तविण्यात आली होती. अशातच काही ठिकाणी काजुच्या पालवी व मोहोरावर ढेकण्या म्हणजेच टी मॉस्कीटो व पिवळसर रंगाच्या, अतिशय सूक्ष्म आकाराच्या फुलकिडीचा या दोन्हीहीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. यामुळे काजू पिकांना धोका निर्माण होऊन काजू उत्पादनावर परिणाम होणार आहे. 
  • अजूनही काही रोगांपासून काजू पिकांना धोका निर्माण होते. यावर येथील बागायतदार आपल्या परीने प्रयत्न करुन नियंत्रण करीत असतात. अशा संकटांना सामोरे जात असतानाच आता येथील काही काजू बियांवर सुरूवातीपासून काळे डाग मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे. हा एक बुरशीजन्य रोगाचा प्रकार असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 फवारणी केली तरी बुरशी !काजू पिकावर येणारे रोग टाळण्यासाठी आवश्यक त्या औषधांची फवारणी वेळोवेळी केली. सर्व प्रकारची काळजी घेतली. तरीपण काजू बियांवर सुरूवातीपासून काळे डाग येण्याच्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे जिल्ह्यातील काजू बागायतदारांनी सांगितले.

उपाययोजना करण्याची मागणीबागायतदारांनी सर्व प्रकारची योग्य प्रकारे औषधांची फवारणी केली, योग्य प्रकारे काळजी घेतली, तरीपण येथील काजु बियांवर काळे डाग येणाचा बुरशीजन्य रोग कोणता आहे, त्यावर उपाय काय आहेत याबाबत काहीच माहिती अजुनही मिळाली नसुन यावर लवकरात लवकर उपाययोजना कृषी विभागाने न केल्यास त्याचा परिणाम निश्चितच काजु उत्पादनावर होणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग