शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाखांच्या अपहारप्रकरणी वरवडे पोस्टमास्तरवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 11:49 IST

तालुक्यातील वरवडे ग्रामीण पोस्टातील बचत खात्यापैकी सुमारे ३५ खातेदारांचे, सुकन्या खात्यांमधील चार खातेदारांचे, आवर्ती खात्यातील १३ जणांचे आणि डी.डी. खात्यातील दोघांचे असे मिळून २ लाख ९२ हजार ४६४ रुपयांचा बनावट सह्या

ठळक मुद्देतक्रार कणकवली पोलिसात दाखल

कणकवली :  तालुक्यातील वरवडे ग्रामीण पोस्टातील बचत खात्यापैकी सुमारे ३५ खातेदारांचे, सुकन्या खात्यांमधील चार खातेदारांचे, आवर्ती खात्यातील १३ जणांचे आणि डी.डी. खात्यातील दोघांचे असे मिळून २ लाख ९२ हजार ४६४ रुपयांचा बनावट सह्या करून अपहार केल्याप्रकरणी वरवडे पोस्टमास्तर भगवान तानाजी सादये ( रा. वरवडे) याच्याविरुद्ध कणकवली पोलिसांनी अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची तक्रार कणकवली उपविभाग डाकघराचे डाक निरीक्षक अमीर खान यांनी दिली.

हा गुन्हा ५ जून २०१५ ते २२ डिसेंबर २०१७  या कालावधीत घडला. १ जानेवारी २०१८ रोजी ज्यावेळी या पोस्टाचे लेखापरीक्षण  झाले, त्यावेळी हा गुन्हा उघडकीस आला. याबाबतची तक्रार दाखल करण्यापूर्वी पोस्टखात्याने पोस्टमास्तर भगवान सादये याच्याकडूनत्याने केलेल्या अपहारप्रकरणी ३ लाख २९ हजार ८८५ एवढी रक्कम भरून घेतली. पोस्टामध्ये ग्राहकांसाठी विविध प्रकारची पैसे बचतीची खाती असतात. यामध्ये लोक विश्‍वासाने पैसे जमा करत असतात.        वरवडे पोस्टमास्तर भगवान सादये यांनी वरीलप्रमाणे विविध खात्यांवरची रक्कम खोट्या सह्या मारून परस्पर काढली. काही रक्कम खातेदारांनी खात्यामध्ये भरण्यासाठी दिली असताना त्यांच्या बचत खात्यांवर केवळ स्टॅम्प मारून दिला, परंतु ते पैसे पोस्टाकडे जमाच केले नाहीत. कणकवली उपविभाग डाकघरामार्फत ज्यावेळी या पोस्टाचे लेखापरिक्षण झाले. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. लेखापरिक्षणानंतर हे पैसे पोस्ट खात्याने भरून घेतले आणि नंतर याबाबतची तक्रार कणकवली पोलिसात दाखल केली. याप्रकरणी पोस्टमास्तर भगवान सादये याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.



टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग