शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

कोकणातील पाण्यावर क्रॉफर्ड उतारा फायद्याचा

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना : कापसाळ येथील धरण चिपळूणकरांची तहान भागवू शकेल

राजेश जोष्टे - खेर्डी --चिपळूण शहराला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी क्रॉफर्ड या मुंबईस्थित ब्रिटिश गव्हर्नरने शतकापूर्वी बांधलेले धरण ओसंडून वाहात असून, इतक्या वर्षांपूर्वी इथूनच ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा होत होता. या धर्तीवर पूरमुक्ती व जलव्यवस्थापन असा दुहेरी हेतू साध्य होण्यासाठी कोकणात प्रसंगी छोटी पण पक्क्या स्वरुपाची धरणे बांधावीत, असा मतप्रवाह जोर धरत आहे. ब्रिटिश गव्हर्नरने पेण आणि चिपळूण येथे छोटी धरणे बांधून घेतली. चिपळुणात कामथे - कापसाळ येथे शीवनदीवर हे धरण बांधण्याची योजना १८७९मध्ये मंजूर झाली होती. या धरणासाठी मोठ्या जमीनदारांनी देणगी दिल्या. विशेष म्हणजे धरण बांधकामाला खर्च थोडा आला तर शहरभर पाईपलाईन फिरवण्यासाठी त्याकाळी साडेचार लाख रुपये खर्ची पडले. एवढी जुनी नळपाणी योजना राज्यात क्वचितच अन्य ठिकाणी सापडेल. १९१०च्या सुमारास ही योजना सुरु झाली होती. ती अव्याहतपणे १९६७ पर्यंत सुरु होती. कोयनेचे धरण बांधल्यानंतर मात्र चिपळूणला वाशिष्ठी नदीतून पाणी पुरवठा होऊ लागला असून आजही तो कायम आहे.चिपळूण नगर परिषद १३६ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असल्याने त्या काळात दोन सुरक्षारक्षकही जलसाठ्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठी नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी नगर परिषदेने उचलण्यास सुरुवात केल्यानंतर गेल्या ४८ वर्षे या धरणाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, तो गाळाने होरला होता. पाटबंधारे खात्याने त्यातील काही गाळ काढला असला तरी हे काम परिपूर्ण झाले नाही. असे असले तरी आजही हे धरण मजबूत स्थितीत आहे. त्याचे स्थापत्यशास्त्र देखणे असल्याने पर्यटक, प्रवासी पावसाळ्यात त्यांच्या विहंगम परिसराचा आनंद घेतात. देशात सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात आहेत व राज्यात होणाऱ्या एकूण पर्जन्यवृष्टीपैकी ४६.५ टक्के पाणी एकट्या कोकणात पडते. पण धरणांची मोठी संख्या कोकणवगळता उर्वरित राज्यात आहेत.